30 November 2020

News Flash

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात रंगणार ‘तुझी माझी जोडी’चा खेळ

'तुझी माझी जोडी'च्या खेळात कोण मारणार बाजी?

'बिग बॉसच्या घरात रंगणार 'तुझी माझी जोडी'चा खेळ

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना विनीत भोंडेला एक विशेष अधिकार मिळाला ज्यानुसार तो कोणत्याही एका स्पर्धकाला पुढच्या आठवड्यात घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करू शकतो. या नियमानुसार विनीतने अनिल थत्ते यांना नॉमिनेट केलं. आता येत्या आठवड्यात अनिल थत्तेंबरोबर कोण नॉमिनेट होईल, प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवले आणि घराबाहेर जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. बिग बॉस मराठीचा आजचा दिवस शांततेत सुरू होणार असून रेशम आणि सईमध्ये सगळं आलबेल असल्याचं चित्र पाहायला मिळेल. घर म्हटलं की भांडणं होणारच, कधी मत जुळणार तर कधी मतभेदही होणार.

विशेष म्हणजे आज स्पर्धकांना बिग बॉसकडून एक टास्क देण्यात येणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये लाडीगोडीने तर कधी वादांमुळे निरनिराळ्या जोड्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. बिग बॉस आज घरातील सदस्यांना ‘तुझी माझी जोडी’ हा टास्क देणार आहे. यामध्ये कोणकोणत्या जोड्यांचं समीकरण कसं जुळेल हे बघण्यासारखं ठरेल.

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीचा पहिला कॅप्टन झाला बेघर

या टास्कचा नॉमिनेशन प्रक्रियेवरही परिणाम होणार असून आता हे स्पर्धक एकमेकांबद्दलचे मतभेद विसरून कशा प्रकारे साथ देतात आणि त्यातून कोण नॉमिनेट होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 3:48 pm

Web Title: bigg boss marathi todays updates tujhi majhi jodi new task
Next Stories
1 Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीचा पहिला कॅप्टन झाला बेघर
2 वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण होण्याआधीच नशीबानं सोडली साथ, डान्सर विनोद ठाकूर ICU त दाखल
3 #DusKaDum : ‘जिसे जिंदगी सिखायें, उसे कौन हराये?’
Just Now!
X