News Flash

डॉक्टर डॉनमध्ये साजरा होणार डॉलीबाईंचा वाढदिवस

या सेलिब्रेशनसाठी खास थीमही ठरवली गेली आहे.

‘डॉक्टर डॉन’ या मालिकेमध्ये सध्या देवा आणि डॉलीबाई यांच्या प्रेमाचे जोरदार वारे वाहतायत. देवा आणि डॉ मोनिका यांच्या नव्याने सुरु झालेल्या या प्रेमाची कहाणी सध्या भेटीगाठी, विविध सरप्राईजेस आणि आनंदाने बहरत चाललीये. आता यामध्ये आणखी एका आनंदाची भर पडतेय ज्याचं निमित्त ठरणारे देवाच्या लाडक्या डॉलीबाई म्हणजेच डॉ मोनिका यांचा वाढदिवस.

डॉलीबाईंचा वाढदिवस हा देवासाठी खास यात तो अधिक खास बनवण्यासाठी देवाने त्याच्या पंटर गॅन्गसोबत सर्वांनाच कामाला लावलंय. वाढदिवसाच्या या सेलिब्रेशनसाठी खास थीमही ठरवली गेलीये आणि ही थीम आहे अंडरवर्ल्डची दुनिया. यानुसार सर्वांनीच आपापले कॅरेक्टर्स ठरवलेत आणि तसे पोशाखही घातलेत. देवा, कबीर, राधा सगळेत यात सहभागी झालेत त्यामुळे डॉलीबाईही खुप खुश होतात. पण देवा आणि डॉ मोनिका यांच्या या प्रेमाला विरोध असणाऱ्या राधाच्या मात्र डोक्यात वेगळीच चक्र फिरतायत आणि त्यानुसार ती या थीम पार्टीमध्येही मोडता घालायचा प्रयत्न करतेय.

राधाच्या या नाराजीच्या सुराने डॉ मोनिका यांच्या वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये नवे विघ्न येणार नाही ना? देवा त्याच्या आयुष्याचे कटू सत्य डॉ मोनिका यांना सांगणार का? काय असणार यांच्या या प्रेमाचे भवितव्य असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण करतायत. ज्याची उत्तरं तुम्हाला मालिकेच्या आगामी भागामधून मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 1:12 pm

Web Title: doctor don monika birthday special episod avb 95
Next Stories
1 रणवीरनं चौकशीदरम्यान दीपिकासोबत उपस्थित राहू देण्याची एनसीबीकडे केली मागणी, कारण…
2 फिरोज खान यांनी ‘या’ तरुणीसाठी सोडले होते पत्नीला
3 एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती अत्यंत नाजूक; सलमाननं केलं ट्वीट, म्हणाला…
Just Now!
X