News Flash

Afghan First Look: गाण्यानंतर आता अभिनयासाठी अदनान सामी सज्ज

पाकिस्तानी मूळ गायक अदनानला २०१५ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले होते

अदनान सामी

इंग्लंडमध्ये जन्मलेल्या आणि गेल्या वर्षभरापासून भारतीय नागरिकत्व मिळालेला गायक- संगीतकार अदनान सामी आता ‘अफगान : इन सर्च ऑफ अ होम’ या सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्शने बुधवारी रात्री अदनानच्या या पहिल्या सिनेमातील लूक त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. या सिनेमात सामी एका संगीतकाराचीच भूमिका साकारणार आहे.

अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा

बुधवारी अदनाननेही आपल्या ट्विटरवरून ही बातमी शेअर केली. सामीने ट्विट करत म्हटले की, ‘अफगान : इन सर्च ऑफ अ होम’ या सिनेमासाठी मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. आज सामीने सिनेमाचे पहिले पोस्टरही त्याच्या ट्विटर अकाऊंटरवरून शेअर केले. या सिनेमाचे दिग्दर्शन राधिका राव आणि विनय सप्रू हे करणार आहेत. ‘भर दो झोली..’ या नावाजलेल्या गाण्याच्या या सुरेल गायकाने दोन्ही दिग्दर्शकांसोबत काम करण्यासाठी उत्साही असल्याचे म्हटले आहे. भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतरचे अदनानचे हे पहिले प्रोजेक्ट आहे.

याआधीही अदनानने राधिका राव आणि विनय सप्रू यांच्यासोबत सलमान खानच्या ‘लकी… नो टाइम फॉर लव्ह’ या सिनेमात काम केले होते. याशिवाय ‘बजरंगी भाईजान’मधील ‘भर दो झोली मेरी’ हे कव्वाली गाणे त्याने गायले असून त्याच्यावरच ते चित्रीतही करण्यात आले होते.

अजय देवगणमुळेच मी अजूनही अविवाहित- तब्बू

पाकिस्तानी मूळ गायक अदनानला २०१५ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले होते. गेल्याच महिन्यात त्याला कन्या रत्नही झाले. मुलीचं नाव त्याने मेदिना सामी खान असं ठेवलं आहे. मूळ अफगाणी असलेली पण जर्मनीमध्ये वास्तव्यास असलेली रोया ही अदनानची तिसरी पत्नी आहे. २०१० मध्ये अदनान आणि रोयाने लग्न केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 2:22 pm

Web Title: fist look adnan sami makes acting debut in a movie afghan in search of a home
Next Stories
1 ऐश्वर्याबद्दलची ‘ती’ वार्ता निव्वळ एक अफवा
2 अमिताभ, सलमान, आमिरला ऑस्करचे आमंत्रण, शाहरुखला वगळले
3 अजय देवगणमुळेच मी अजूनही अविवाहित- तब्बू
Just Now!
X