News Flash

….म्हणून सलमान, सुनील ग्रोव्हर कपिलच्या रिसेप्शनला अनुपस्थित

कपिलनं २४ डिसेंबरला मुंबईत बॉलिवूडसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं.

कॉमेडीचा बादशहा कपिल शर्मा प्रेयसी गिन्नीसोबत गेल्याच आठवड्यात विवाहबंधनात अडकला. कपिलनं २४ डिसेंबरला मुंबईत बॉलिवूडसाठी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. यात अनिल कपूरपासून ते दीपिका रणवीरसह अनेक सेलिब्रिंटीची मांदियाळी पाहायला मिळाली. या पार्टीसाठी सलीम खान, सोहिल खानदेखील आले होते मात्र या ‘खान’दानात सलमान खान मात्र अनुपस्थित होता.

सलमान कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’ची निर्मिती करत आहे. मात्र रिसेप्शन पार्टीसाठी तो मात्र गैरहजर राहिला. सुत्रांच्या माहितीनुसार सलमान ‘बिग बॉस १२’ च्या चित्रीकरणात व्यग्र होता, तसेच २४ डिसेंबरला बॉलिवूडकरांसाठी कतरिनानं ख्रिसमस पार्टीचं आयोजनही केलं होतं. या कारणासाठीच सलमान रिसेप्शनला उपस्थिती राहू शकला नाही असं समजत आहे.

तर दुसरीकडे सुनील ग्रोव्हरदेखील कपिलच्या पार्टीत अनुपस्थित होता. सुनीलनं कपिलला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा ट्विटरच्या माध्यमातून दिल्या होत्या. त्याला कपिलनं रिसेप्शन पार्टीचं आमंत्रणही दिलं होतं, मात्र कपिलच्या रिसेप्शन पार्टीसाठी उपस्थित राहण्यापेक्षा सुनीलनं सेलिब्रिटींच्या ख्रिसमस पार्टीसाठी उपस्थित राहणं पसंत केलं.
कपिल आणि सुनीलमधला वाद मिटवण्याचा प्रयत्न सलमाननं केला होता. या दोघांनी पुन्हा एकत्र यावं अशी सलमानची इच्छा होती. मात्र कपिलचा शो सुरू होण्यापूर्वीचं सुनीलनं आपला नवा कोरा कॉमेडीशो घेऊन छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 7:02 pm

Web Title: here why salman khan and sunil grover was not present for kapil sharma reception
Next Stories
1 ‘सेक्रेड गेम्स’च्या आधी सलमानसोबतही झळकली होती कुब्रा
2 अमृताने केला विशेष मुलांसोबत ‘ख्रिसमस’ साजरा
3 ‘तख्त’मध्ये रणवीर, विकी साकारणार या ऐतिहासिक भूमिका ?
Just Now!
X