News Flash

कृष्णाने उडवली गोविंदाची खिल्ली, सलमानला हसू अनावर

तुम्हालाही हसू येईल

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणून ‘द कपिल शर्मा’ शोकडे आज पहिले जाते. या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा याने त्याच्या विनोदाने अनेकांच्या मनात घर केले आहे. शो मधील कपिल शर्मा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचे विनोद चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. शोमध्ये येणारे कलाकार हे शोला आणखी रंजक करतात. नुकताच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये बॉलिवूडचा दबंग खान सलमानने हजेरी लावली. दरम्यान कृष्णा अभिषेकच्या विनोदावर सलमानला प्रचंड हसू आले आहे.

नुकताच ‘दबंग ३’ चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्मा शोमध्ये पोहचली होती. त्यावेळी प्रभूदेवा, सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान तेथे उपस्थीत होते. दरम्यान कृष्णा प्रभूदेवा जवळ जातो आणि म्हणतो ‘चित्रपटात तुमच्यासोबत हे आयोग्य झाले आहे. इतका मोठा चित्रपट आहे. त्यातील गाणीही खूप मोठी आहेत. डान्सर असूनही चित्रपटाच्या गाण्यामध्ये तुम्हाला छोटासा रोल देण्यात आला आहे. त्यावर कपिल शर्मा प्रभूदेवा चित्रपटाचा दिग्दर्शक असल्याचे कृष्णाला सांगतो.

ते ऐकून कृष्णा लगेच ‘सलमान पण दिग्दर्शक आहे ना? पण त्याने चित्रपटात अरबाजला देखील भूमिका दिली आहे. मी खरं सांगतो भाऊ-भाऊ असतो, काका-मामा हे फक्त बोलायला असतं’ असे म्हणतो. कृष्णाचे बोलणे ऐकून सर्वत्र हास्याची लाट पसरते. सलमान खानला तर हसू अनावर झाल्याचे दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 4:02 pm

Web Title: in kapil shram show krishna abhishek take digg on govind and after hearing that salman can not controlled himself laughuing avb 95
Next Stories
1 विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर संतापली पूजा भट्ट
2 #पुन्हानिवडणूक?चे रहस्य उलगडलं, ‘धुरळा’चा ट्रेलर प्रदर्शित
3 बिग बॉसमधील निवृत्तीच्या प्रश्नावर सलमान म्हणाला…
Just Now!
X