संपूर्ण जगात सध्या करोना व्हायरसने थैमान घातले आहे. २०० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. या करोना विषाणूच्या संसर्गाला बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने ‘जैविक युद्ध’ असे म्हटले आहे.

काय म्हणाली कंगना?
“जगभरातील सर्वच देश सध्या करोना विषाणूशी लढत आहेत. या लढाईला आपण एक प्रकारचं जैविक युद्धच म्हणू शकतो. या युद्धामुळे अमेरिकासारखा विकसित देश देखील आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे. आपलीही अवस्था फारशी वेगळी नाही. २१ दिवसांच्या लॉकडाउनमुळे देशातील सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. दररोज आपले कोट्यवधींचे नुकसान होत आहे. आपण लवकरात लवकर या जैविक युद्धाला जिंकण्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हव्यात. अन्यथा आर्थिकदृष्ट्या आपण आणखी १० वर्ष मागे जाऊ.” असं कंगना रनौत टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

कंगना सध्या आपल्या कुटुंबियांसोबत मनाली येथे आहे. तिथे तिने स्वत:ला सेल्फ क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. ती देखील इतर कलाकारांप्राणेच लॉकडाउन संपण्याची आतुरतेने वाट पाहात आहे. कारण तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबले आहे.