21 January 2021

News Flash

Video : रणवीरने लग्नात केला होता कपिल शर्माचा अपमान, अशी होती दीपिकाची प्रतिक्रिया

कपिलने सांगितलेला मजेशीर किस्सा ऐकून तुम्हालाही हसू येईल.

छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा.’ लॉकडाउनमुळे या शोचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. पण आता पुन्हा या शोच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा नेहमीच चर्चेत असतो. तसेच बॉलिवूडमधील अनेक कलाकार शोमध्ये हजेरी लावताना दिसता. ते त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी कपिल शर्मासोबत शेअर करताना दिसतात. त्याचबरोबर कपिल देखील त्याच्या आयुष्यातील गोष्टींचा खुलासा करताना दिसतो. एकदा कपिलने रणवीरशी संबंधीत एक मजेशीर किस्सा सांगितला होता. आता त्याचा हा किस्सा सांगतानाचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर कपिल शर्मा शोमधील काही जुने व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. त्यातील एका व्हिडीओत शोमध्ये अभिनेत्री दीपिका पदूकोणला पाहुणी कलाकार म्हणून बोलवण्यात आल्याचे दिसत आहे. दरम्यान ते दोघेही दीपिकाच्या लग्नाविषयी बोलताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये रणवीर सिंहने लग्नात अपमान केला असल्याचे कपिल दीपिकाला सांगतो. ‘रणवीरने मला लग्नात बोलावले आणि माझा अपमान केला. तुला माहित आहे त्याने काय केले? तू पण तिथेच होतीस. बाजूला’ असे कपिल बोलतो.

‘रणवीरने मला बोलवले होते आणि मला म्हणाला बघ दीपिकाला घेऊन गेलो. असा कोण अपमान करतं’ असे कपिल शर्मा दीपिकाला सांगतो. ते ऐकून सर्वांना हसू अनावर होते. नंतर दीपिका हसत ‘हो हे खरं आहे’ असे म्हणते.

१४ नोव्हेंबर २०१८ मध्ये इटलीतील लेक कोमो परिसरात असलेल्या एका आलिशान व्हिलामध्ये दीपिका-रणवीरने लग्नाची गाठ बांधली. यावेळी या जोडीने कोंकणी आणि सिंधी दोन्ही पद्धतीने लग्न केले होते. त्यांनी लग्नाला त्यांच्या जवळील मित्रपरिवाला बोलावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 4:30 pm

Web Title: kapil sharma reveal ranveer singh humiliated him at his wedding avb 95
Next Stories
1 पुरस्कार सोहळ्यातील ‘तो’ व्हिडीओ शेअर करत पूजा भट्टने केला कंगनावर पलटवार
2 …जेव्हा सुझानसाठी संपूर्ण सलून रिकामं करावं लागतं
3 जॅकी श्रॉफची सामाजिक बांधिलकी; गरजुंसाठी दिला मदतीचा हात
Just Now!
X