20 January 2018

News Flash

परिणीतीच्या आयुष्यात ‘त्या’ची एण्ट्री

ड्रीम टूरच्या वेळी त्यांची ओळख झाली होती

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 21, 2017 8:25 PM

परिणीती चोप्रा

चित्रपटसृष्टीत नाती जितक्या वेगाने आकारास येतात तितक्याच वेगाने त्या नात्यांमध्ये दुरावा येतो आणि पुन्हा एकदा नव्या नात्यांना वावही मिळतो. अशाच एका नव्या नात्याची चर्चा सध्या बी- टाऊनमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि धर्मा प्रॉडक्शन हाऊसमधील एक सहाय्यक दिग्दर्शक सध्या एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. २०१६ मध्ये झालेल्या ड्रीम टूरमध्ये चरित देसाई आणि परिणीतीची ओळख झाली होती. त्यावेळी तो बिहाइंड द सीन्सच्या व्हिडिओंचे चित्रीकरण करत होता.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून परिणीती आणि चरित एकमेकांसोबत जास्त वेळ व्यतीत करत असल्याचे म्हटले जातेय. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये मैत्रीपासून सुरु झालेले त्यांचे हे नाते आता मैत्रीपलीकडे गेल्याचे म्हटले जात आहे.
चरितसोबत नाव जोडले जाण्यापूर्वी परिणीती दिग्दर्शक मनिष शर्मा याला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटापासून त्यांचे नाव जोडले गेले होते. पण, त्यानंतर मात्र या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या.

परिणीती सध्या तिच्या अभिनय कारकिर्दीवर जास्त लक्ष केंद्रित करत असून लवकरच ती ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता आयुषमान खुरानासोबत स्क्रिन शेअर करत असून, मे महिन्याच्या १२ तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याव्यतिरिक्त परिणीती रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटातही झळकणार आहे.

First Published on April 21, 2017 8:25 pm

Web Title: meri pyaari bindu fame bollywood actress parineeti chopra is dating handsome assistant director
  1. No Comments.