Bengaluru Doctor Slams Smoker : सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकार असते हे सर्वांना माहीत असते. तरी अनेकांच्या सकाळची सुरुवात सिगारेट ओढण्याने होते. रोज सकाळी चहा, कॉफीबरोबर अनेकांना सिगारेट ओढण्याची सवय असते. काही लोक तर उठल्यानंतर फ्रेश होण्याआधीच सिगारेट ओढतात. याच सिगारेटसंदर्भातील तरुणीची एक वादग्रस्त पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरुणीला बेंगळुरूमधील एका डॉक्टरने चांगलेच फटकारले आहे. तरुणीने तिच्या पोस्टमध्ये जे लोक सिगारेट पित नाही, त्यांना लूजर असे म्हटले आहे. ज्यावर डॉक्टरांनी तिला खडेबोल सुनावले आहेत.

तरुणीने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले?

तरुणीने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) सिगारेट ओढतानाचा फोटो पोस्ट करत लिहिले की, अरे स्मोकर्स आणि लूजर्स (सिगारेट न ओढणारे) , तुम्ही सर्व काय करत आहात? फोटोत महिलेच्या हातात चहा आणि सिगारेट आहे. तिच्या पोस्टवर डॉक्टरांनी सडेतोड उत्तर देत लिहिले की, ट्रिपल बायपास सर्जरीसाठी मी पाठवलेला सर्वात तरुण रुग्ण ही २३ वर्षांची मुलगी होती, जी धूम्रपान करत होती. त्यामुळे मी लूजर आहे आणि निरोगी जीवन जगत आहे.

Rajasthan Road Accident Video 6 Of Family Killed After Car Rams Truck
ट्रक चालकाची एक चूक अन् होत्याचं नव्हतं झालं; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू; अपघाताचा VIDEO पाहून सांगा चूक कोणाची?
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Kiran Mane Post Viral
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…

क्षणात होत्याचं नव्हतं! भरधाव कारने एकाच वेळी उडवले चौघांना; अंगाचा थरकाप उडविणारा VIDEO

दरम्यान, ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर लोकही विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, धूम्रपान सोडल्यानंतर, त्यामुळे जाणवणारे परिणाम कमी होऊ शकतात का? त्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्याचे काही उपाय आहेत का? आणखी एका युजरने लिहिले की, मधुमेहाच्या रुग्णांसाठी दिवसातून एक सिगारेट किती धोकादायक ठरू शकते? मी गेल्या ४० वर्षांपासून सेवन करत आहे. अशाप्रकारे अनेक जण डॉक्टरांना पाठिंबा देत आहेत. यावर चौथ्या युजरने लिहिले की, ३६ वर्षे धूम्रपान केल्यामुळे मी लूजर व्यक्ती बनलो आहे. आता रात्री मी सिगारेट ओढण्याची सवय सोडली आहे. यावर आणखी एका युजरने लिहिले की, गर्व आहे मी लूजर आहे याचा.

मुद्दा काही असला तरी सिगारेट ओढणे आरोग्यासाठी घातकच आहे. यामुळे सिगारेट ओढण्याच्या व्यसनापासून दूर राहायचे असेल तर काही चांगल्या गोष्टी फॉलो करणे फार गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या घरात किंवा बेडरूममध्ये असलेले सिगारेटचे पॅकेट फेकून द्या.  पुढे तुम्ही कामावर जाण्यासाठी जेव्हा बाहेर पडता तेव्हा तुमच्या कारमध्ये, खिशात किंवा बॅगमध्ये सिगारेट किंवा लायटर नाही ना हे तपासा. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत म्हणजे ज्यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन नाही अशा व्यक्तींबरोबर प्रवास करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्ही तुमच्या कृतींवर नजर ठेवत सिगारेट विकत घेण्यापासून आणि पेटवण्यापासून स्वत:ला रोखण्यास मदत करू शकता.