आतापर्यंत विविध खेळांवर आधारित अनेक चित्रपट आपण पाहिलेत पण अस्सल मातीतला खेळ ‘कबड्डी’ तसा दुर्लक्षितच राहिला म्हणायचा. नेमकी हीच बाब हेरत जयंत लाडे यांनी ‘सूर सपाटा’ या चित्रपटाची निर्मिती केली. हा कबड्डीवर आधारित मराठी चित्रपट येत्या २२ मार्चला संपूर्ण महाराष्ट्राला कबड्डी… कबड्डी… म्हणायला भाग पाडेल यात काही शंका नाही. मंगेश कंठाळे दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ७० एम एमवर खेळल्या जाणाऱ्या या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली असून त्याचा वेगवान, उत्कंठा ताणणारा टीझर प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

उनाड पण कुशल विद्यार्थ्यांभोवती गुंफलेली ‘सूर सपाटा’ची कथा प्रेक्षकांची उत्कंठा टप्प्याटप्प्याने वाढवत राहते. जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही सामान्य विद्यार्थ्यांतील असामान्य कौशल्य जाणून त्यांना स्पर्धेमध्ये उतरवू पाहणारे शिक्षक एकीकडे तर आपणही एखादं मैदान मारू शकतो याची जाणीव झालेले विद्यार्थी दुसरीकडे. या दोघांमधला सुवर्णमध्य साधणारा ‘सूर सपाटा’ प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची एक संधी मिळाली तर तो त्याचं कसं सोनं करू शकतो हे दाखवतो. लाडे ब्रोज् फिल्म्सचा ‘सूर सपाटा’ हा दुसरा चित्रपट असून याआधी त्यांनी ‘पेईंग घोस्ट’ या विनोदी चित्रपटाची यशस्वी निर्मिती केली होती.

Sanyukta Maharashtra movie
‘संयुक्त महाराष्ट्र’ चळवळीचा लढा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार, नवीन मराठी चित्रपटाची घोषणा, पोस्टरही प्रदर्शित
Prajakta mali namrata sambherao and Maharashtrachi Hasyajatra Women dance On Nach Ga Ghuma Song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्रींचा ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या टीमबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
marathi actor Makarand Anaspure appeared in the look of CM Eknath Shinde in the movie Juna Furniture
‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो
cannes film festival, FTII, short film,
प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवात पुण्याच्या एफटीआयआयचा लघुपट

अनेक दर्जेदार चित्रपटांतून आपली छाप सोडणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप सोबत यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद तांबावडे आदींच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित ‘सूरसपाटा’च्या निमित्ताने तब्ब्ल २५ दिग्गज कलावंतांचा ताफा आमने-सामने येणार असून तूर्तास त्यांची नावे गुलदस्त्यात आहेत. विशेष म्हणजे ‘सूर सपाटा’ला माजी कबड्डीपटू अर्जुनपुरस्कार विजेते शांताराम जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून ३०० राष्ट्रीय कबड्डीपटूंचाही या चित्रपटात सक्रीय सहभाग आहे. या चित्रपटाचे संवादलेखन अमित बैचे यांनीच केले आहे.