‘कच्चा लिंबू’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ या चित्रपटाची फार उत्सुकता निर्माण झाली आहे. चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री, हेमंत ढोमे, प्रियदर्शन जाधव, सिद्धार्थ चांदेकर, राहुल रानडे, सुहास जोशी आणि क्षिती जोग ही कलाकारांची मोठी फौज या चित्रपटात आहे. मुलासाठी मोठं धाडस केलेल्या आईची ऐतिहासिक गोष्ट यामध्ये भव्यदिव्य स्वरुपात दाखवण्यात येणार आहे.

कलाकारांची फौज, व्हीएफएक्स, भव्यदिव्य सेट्स अशी एकंदर जोरदार तयारी प्रसादने या चित्रपटाच्या निमित्ताने केली आहे.

इरादा एंटरटेन्मेंटच्या फाल्गुनी पटेल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. लॉरेन्स डिसुझा सहनिर्माते आहेत. तर राजेश मापुसकर यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी पेलली आहे. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.