News Flash

‘प्यारवाली लव्हस्टोरी’ ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला

प्रसिध्द दिग्दर्शक संजय जाधव यांचा 'प्यारवाली लव्हस्टोरी' हा आगामी चित्रपट या वर्षी २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.

| March 26, 2014 01:41 am

प्रसिध्द दिग्दर्शक संजय जाधव यांचा ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ हा आगामी चित्रपट या वर्षी २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. ‘दुनियादारी’च्या प्रचंड यशानंतर संजय जाधव ‘ड्रिमिंग 24X7’ आणि ‘एसटीव्ही’ यांच्या संयोगाने पुन्हा एकदा हीट फॉर्म्युला घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ या त्यांच्या आगामी चित्रपटात ‘दुनियादारी’चीच टीम नव्या अंदाजात दिसणार आहे. अभिनेता स्वप्निल जोशी आणि सई ताम्हणकर प्रमुख भूमिकेत असून, उर्मिला कणेकर-कोठारे आणि नागेश भोसले अन्य महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय उपेन्द्र लिमये, समिर धर्माधिकारी आणि चिन्मय मांडलेकर ही नवी मंडळी या चित्रपटात काम करित आहे. अशी भव्य साटरकास्ट असलेला हा चित्रपट मोठ्यापडद्यावर प्रेमाची जादू पसरवणार आहे. या चित्रपटाची कथा व्यक्तिसापेक्षनसून समाजात आजूबाजूला घडत असलेल्या घटनांवर आधारीत आहे. एक दमदार चित्रपट निर्माण करण्यासाठी दिग्दर्शक संजय जाधव कोणतीही कसर शिल्लक न ठेवत मेहनत घेत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाआगोदर करण्यात येणाऱ्या सखोल अभ्यासाच्या हॉलिवूड पध्दतीवरून प्रेरणा घेऊन पहिल्यांदाच मराठी चित्रपटातदेखील असा अनोखा प्रयोग करण्यात येत आहे. स्वप्निल आणि सईसाठी खास सरावसत्राचे आयोजन करण्या आले आहे, जेणेकरून चित्रपटातील त्यांचा अभिनय खुलून दिसेल. चित्रपटातील गाण्यांना रोहित राऊत, सायली पंकज, बेला शेंडे, अदर्श शिंदे आणि अमृतराज यांचा आवाज असून, गाण्यांचे बोल मंगेश खांगणे, सचिन पाठक आणि गुरु ठाकुर यांचे आहेत, तर संगीत पंकज पाडगणे, अमृतराज आणि समिर सप्तिसकर यांचे आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथा संजय जाधव यांची असून, निर्मिती रेखा जोशी, इंदर राज कपूर आणि संजय जाधव यांची आहे, तर सरिता पाटील आणि दीपक राणे हे सह-निर्माता आहेत. पटकथा आणि संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. एप्रिल २०१४ मध्ये चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात होणार आहे.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2014 1:41 am

Web Title: pyaar vali love story hits to theater on october 2
Next Stories
1 खिलाडी-देवा जोडी पुन्हा एकत्र!
2 ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये सलमानची दुहेरी भूमिका
3 हॉलीवूड चित्रपट ‘वॉरियर’ हिंदीत!
Just Now!
X