27 September 2020

News Flash

‘आशिकी’ फेम राहुल रॉयला पोलिसांनी मारले? व्हायरल झाला फोटो

राहुल रॉयने शेअर केलेल्या फोटो मागचे जाणून घ्या सत्य

‘आशिकी’ या हिट चित्रपटातील अभिनेता राहुल रॉयचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा फोटो खुद्द राहुल रॉयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये राहुल रॉयला पोलीस अधिकारी मारताना दिसत आहेत. त्यामुळे हा फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. पण हा फोटो राहुल रॉयच्या आगामी चित्रपटातील एका सीनमधील आहे.

राहुल रॉयने हा फोटो शेअर करत ‘द वॉक… दिग्दर्शक नितिन गुप्ता, नियोल फिल्म… टीम एफर्टवर मला गर्व आहे’ असे म्हटले आहे. राहुल रॉयच्या ‘द वॉक’ या चित्रपटाची कथा प्रवासी मजदूर कामगारांवर आधारित आहे. चित्रपटात दोन प्रवासी मजदूर कामगारांची कथा दाखवण्यात येणार आहे. तसेच त्यांचा मुंबई ते उत्तर प्रदेशपर्यंतचा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

The walk … dir Nitin Gupta neole films proud of the teams effort

A post shared by Rahul Roy (@officialrahulroy) on

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

American stroke networks ..Dir Nitin Gupta ..thank you a story that needs to be told

A post shared by Rahul Roy (@officialrahulroy) on

आणखी वाचा : ‘आशिकी’चे गाणे या पाकिस्तानी गाण्याची कॉपी? विवेक अग्नीहोत्रीने शेअर केला व्हिडीओ

राहुल रॉय १९९० साली ‘आशिकी’ चित्रपटामुळे चर्चेत होता. हा चित्रपट त्यावेळी हिट ठरला होता. तसेच चित्रपटातील गाणे विशेष गाजले होते. त्यानंतरच्या त्यांच्या चित्रपटांनी फारशी कमाई केली नाही. पण बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये एण्ट्री होताच राहुल रॉय पुन्हा एकदा चर्चेत होता. आता त्यांच्या या आगामी चित्रपटाची चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 8:49 am

Web Title: rahul roy upcoming movie the walk photo beaten by police viral on internet avb 95
Next Stories
1 …म्हणून जॉनी लिवर यांना झाला होता तुरुंगवास?
2 प्रसिद्ध अभिनेत्रीला करोनाची लागण; रुग्णालयात उपचार सुरु
3 दिशा सालियन मृत्यू प्रकरण : …आणि या अभिनेत्याने मागितली सुरज पंचोलीची माफी
Just Now!
X