27 November 2020

News Flash

‘ब्रेकअप’नंतर रविनाने केला होता आत्महत्येचा प्रयत्न…

रविनाचा एक जुना किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आहे.

रविना टंडन बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. रविनाने एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. गेल्या काही काळापासून रविना अभिनयापासून काहीशी दूर असली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र, ती कायमच चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. अलिकडेच रविनाने आपला ४५वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने रविनाचा एक जुना किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

May Mata Lakshmi bless us All with the real wealth of Nature , Love Peace and Happiness . A greener happier planet.

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon) on

सध्या रविना आपल्या वैवाहिक जीवनात मग्न आहे. परंतु ९०च्या दशकात तिचं नाव तक्तालीन सुपरस्टार अजय देवगनबरोबर जोडलं गेलं होतं. त्यावेळी रविना अजयच्या प्रेमाच्या आकंठ बुडाली होती. परंतु काही कारणास्तव ते नातं दिर्घ काळ टिकू शकलं नाही. त्यावेळी अचानक झालेल्या ब्रेकअपमुळे तिने आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला होता अशी माध्यमात चर्चा होती. त्यानंतर तिचं नाव अक्षय कुमार बरोबर जोडलं गेलं त्यामुळे अजय बरोबरचे तिचे किस्से हळूहळू चर्चेतून नाहीसे झाले. परंतु वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या आत्महत्येचा किस्सा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे.

याआधी रविना आजी होणार म्हणून सोशल मीडियावर चर्चेत होती.

रविनाने २००४ साली म्हणजेच १५ वर्षांपूर्वी लग्न केले. या पार्श्वभूमिवर विचार करता तिच्या मुलांचे वय १४ वर्षांपेक्षा अधिक असणे शक्यच नाही. मग ती आजी कशी काय होऊ शकते? हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल परंतु तरीही ती आजी होणार, हे मात्र सोळा आणे खरे आहे. खरं तर रविनाने लग्नापुर्वीच दोन मुलींना दत्तक घेतले होते. १९९५ साली दत्तक घेतलेल्या या मुलींची नावे छाया आणि पूजा अशी आहेत. त्यावेळी पूजाचे वय ११ वर्ष होते तर छाया आठ वर्षांची होती. यातील छाया आता लवकरच आई होणार आहे. त्यामुळे छायाची आई रविना आपल्या मुलीच्या बाळाची आजी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 12:24 pm

Web Title: raveena tandon breakup suicide mppg 94
Next Stories
1 ‘यंदाची दिवाळी फटक्यांनी नाही, तर दिव्यांच्या प्रकाशात साजरी करा’, बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा
2 ‘या’ कारणामुळे आर्यन कधीच अभिनय करु शकणार नाही – शाहरुख खान
3 ‘तुझ्यात जीव रंगला’मधील ही अभिनेत्री घेणार प्रेक्षकांचा निरोप
Just Now!
X