आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी वाटेल ते करायला रेडी असतात. मग त्या कलाकाराचा एखादा कार्यक्रम असो किंवा प्रदर्शित होणारा आगामी चित्रपट असो चाहते तेथे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. असेच काहीसे मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगूरुसोबत झाले आहे. आर्चीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
नांदेडमधील सारखनी येथील लेंगी महोत्सवाला रिंकू राजगूरुला पाहुणी म्हणून बोलवण्यात आले होते. रिंकूची एक झलक पाहण्यासाठी तेथे चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. इतकी गर्दी पाहून आयोजकांना रिंकूच्या सुरक्षेसाठी धावपळ करावी लागली. दरम्यान तेथील लोकांना करोनाचा देखील विसर पडल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर रिंकूने हजेरी लावलेल्या या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये रिंकूने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. ती या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
View this post on Instagram
‘सैराट’ या पहिल्यावहिल्या चित्रपटातून रिंकू घराघरात पोहोचली. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आकाश ठोसर मुख्य भूमिकेत होता. पर्श्या आणि आर्चीची जोडी आजही अतिशय लोकप्रिय आहे. त्यानंतर रिंकूने ‘कागर’ या चित्रपटात काम केले. तिने ‘हण्ड्रेड’ या हिंदी वेब सीरिजमध्ये भूमिका साकारली. आता ती ‘अनपॉज्ड’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट पाच मंडळींनी बनवला होता. राज अँड डीके, निखील अडवाणी, तनिष्ठा चॅटर्जी, अविनाश अरूण आणि नित्या महरातो हे एकत्र या चित्रपटासाठी काम करत आहेत. या चित्रपटात पाच लघुपट एकत्र करण्यात येणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 5:58 pm