News Flash

डिसेंबरमध्ये दुसरे लग्न करणाऱ्या रघुरामला पहिल्या पत्नीने दिला ‘हा’ संदेश

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण रघुने त्याच्या प्रेयसीबद्दल सर्वात आधी त्याच्या पूर्वाश्रमीची पत्नी सुगंधालाच सांगितले होते.

रोडीज शोचा परीक्षक रघुरामने त्याच्या पत्नीशी जानेवारीमध्ये घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर त्याने कॅनेडियन गायिका नताली डी लुसियोला डेट करत असल्याचे मान्य केले होते. आता रघु डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. रघुने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नतालीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोला रघुने आय लव्ह यू असे कॅप्शनही दिले.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण रघुने त्याच्या प्रेयसीबद्दल सर्वात आधी त्याच्या पूर्वाश्रमीची पत्नी सुगंधालाच सांगितले होते. यावेळी सुगंधाने त्याला जुन्या चुका दुसऱ्यांदा न करण्याचा सल्ला दिला. नताली आणि रघुच्या रिलेशनशिपला १ वर्ष झाले. या वर्षपूर्तीच्या आनंदाचे औचित्य साधून रघुने पहिल्यांदा चाहत्यांसमोर त्याच्या नात्याचा स्विकार केला. नताली आणि रघु यांनी २०१६ मध्ये आंखों ही आंखों में या गाण्यात एकत्र काम केले होते. त्यांच्या ओळखीचे रुपांतर हळू हळू प्रेमात झाले. रघुच्या आधी नतालीने टीव्ही कलाकार एजाज खानला चार वर्ष डेट केले आहे.

नतालीने ‘इंग्लिश- विंग्लिश’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ सिनेमांसाठी गाणी गायली आहे. सुगंधी गर्गसोबतच्या १० वर्षांच्या संसारानंतर रघुने घटस्फोट घेतला होता. दोघांनीही आपल्या घटस्फोटाची बातमी सोशल मीडियावर दिली होती. या दोघांचा संसार मोडला असला तरी हे दोघं आजही खूप चांगले मित्र आहेत. रघु अनेक रिअॅलिटी शोचा भाग राहिला आहे. तो ‘रोडीज’ आणि ‘स्प्लिट्सव्हिला’ या शोचा निर्माताही होता. तर सुगंधाने ‘जाने तू या जाने ना’ आणि ‘तेरे बिन लादेन’ सिनेमांत काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 12:55 pm

Web Title: roadies fame raghuram to marry second time with canadian singer in december
Next Stories
1 65th national film awards : हे तर प्रसाद ओकचंच श्रेय – सोनाली कुलकर्णी
2 ६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; ‘कच्चा लिंबू’ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
3 पंतप्रधानांची भेट घेताना प्रियांकाने टाळली ‘ती’ चूक
Just Now!
X