किंग खान हा नेहमीच कुटुंबवत्सल पिता म्हणून ओळखला जातो. शुटिंगच्या व्यस्त कारभारातून जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तो आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवणे जास्त पसंत करतो. काही तासांपूर्वीच शाहरुखने इन्स्ट्राग्रामवर त्याचा आणि मुलगा अब्रामचा खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला. यात तो आणि अब्राम स्पायडर मॅन बनले आहे. शाहरुख लाल स्पायडर मॅन बनला आहे तर छोटा अब्राम काळ्या स्पायडर मॅन बनला होता. त्यांच्यातली मस्ती शाहरुखच्या फॅन्सना नक्कीच आवडणार यात काही शंका नाही. त्याने आतापर्यंत अब्रामचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबूक अशा सोशल मीडिया साइट्सवर शेअर केले आहेत.
सध्या शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा इम्तियाज अलीच्या आगामी ‘द रिंग’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. नुकतेच या सिनेमाचे प्रागमध्ये चित्रिकरण संपले. शाहरुखने प्रागमध्ये असतानाचे काही फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केले. ‘द रिंग’ सिनेमामुळे शाहरुख आणि इम्तियाज अलीला पहिल्यांदा एकत्र काम करण्याची संधी मिळालीय. यात शाहरुख एका टूरिस्ट गाइडच्या भूमिकेत दिसेल.
बॉलिवूड बादशहाचा ‘रईस’ हा सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच, गौरी शिंदेच्या आगामी ‘डियर जिंदगी’ या सिनेमातूनही शाहरुख खान आणि आलिया भट हे कलाकार झळकणार आहेत. त्यामुळे किंग खानच्या सिनेमांची ही रांग पाहता येणाऱ्या काळात बॉलिवूड शाहरुखमय होणार असेच दिसत आहे.

“We cannot accomplish all that we need to do without working together” #srkinstagyaan

A video posted by Shah Rukh Khan (@iamsrk) on

The distance between you and the world around you can only be closed by the innocent…#srkinstagyaan

A video posted by Shah Rukh Khan (@iamsrk) on

Lessons from father to son…Don’t be a life spectator, take the plunge. Nail polish is optional.

A video posted by Shah Rukh Khan (@iamsrk) on