28 January 2021

News Flash

भारतात लॉकडाउन सुरु असताना सनी लिओनी पोहचली अमेरिकेत, ‘हे’ आहे कारण

सोशल मीडियावर दिली माहिती

अभिनेत्री सनी लिओनी तिचा पती डॅनिअल वेबर यांनी आपल्या तीन मुलांसह लॉकडाउन काळात भारत सोडून अमेरिकेला जाणं पसंत केलं आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता आपल्या मुलांसाठी अमेरिका अधिक सुरक्षित असल्याचं सांगत सनी लिओनी आणि डॅनिअल वेबरने हा निर्णय घेतल्याचं समजतंय. सनी लिओनी आपल्या ३ मुलांसह इन्स्टाग्रामवर फोटो टाकत सोशल मीडियावर यासंदर्भातली माहिती दिली.

सनी लिओनीचा पतीन डॅनिअलनेही स्वतःचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आहे. कॅलिफोर्निआच्या स्टुडीओ सिटीमधून डॅनिअलने Getting better with the new vibes, अशी कॅप्शन देत आपण अमेरिकेत सुखरुप पोहचल्याचं सांगितलं. दोन दिवसांपूर्वी सनी व तिचं कुटुंब अमेरिकेत पोहचलं.

View this post on Instagram

Getting better with the new vibes !!!

A post shared by Daniel "Dirrty" Weber (@dirrty99) on

सनी लिओनी व तिचा पतीन डॅनिअल वेबर हे अमेरिकेचे अधिकृत नागरिक आहेत. २०१२ पासून सनी मुंबईत राहत होती. एका युजरने डॅनिअलला तुम्ही अमेरिकेत कसे पोहचलात असं विचारलं असता डॅनिअलने सरकारने व्यवस्था केलेल्या विमानाने आपण अमेरिकेत आल्याचं सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 5:42 pm

Web Title: sunny leone travels to the us with family cites childrens safety for her decision psd 91
Next Stories
1 ‘तुमचे दात तुटल्यास मला दोष देऊ नका’; मिलिंद सोमणचा अतरंगी वर्कआऊट व्हिडीओ
2 तारक मेहतामधील या कलाकाराला सुरुवातीला ३ रुपयांसाठी करावे लागत होते अनेक तास काम
3 दोन दशकांनंतर प्राण यांनी ‘जंजीर’मधील माझ्या कामाचं केलं कौतुक – अमिताभ बच्चन
Just Now!
X