20 September 2020

News Flash

Video : शनायाच्या ‘गॅटमॅट’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

'गॅटमॅट' हा येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

गॅटमॅट ट्रेलर प्रदर्शित

‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं… तुमचं आमचं सेम असतं…’ ही मंगेश पाडगावकरांची कविता प्रेमवीरांमध्ये लोकप्रिय आहे. प्रेमात पाडणाऱ्या या कवितेने अनेकांचे ‘गॅटमॅट’ देखील जुळवून दिले आहे. अशाच प्रेमाचं गोड समीकरण उलगडणाऱ्या ‘गॅटमॅट’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि यशराज इंडस्ट्रीज निर्मित ‘गॅटमॅट’ हा येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट म्हणजे प्रेमीयुगुलांसाठी पर्वणी ठरणार असल्याचं दिसून येत आहे.

निशीथ श्रीवास्तव दिग्दर्शित या चित्रपटामध्ये लोकप्रिय अभिनेत्री शनाया अर्थात रसिका सुनील झळकली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये कॉलेज विश्वाची रंगतदार सफर प्रेक्षकांना घडविण्यात आली असून प्रत्येक कॉलेज कट्ट्यावर दिसणारी तरुण-तरुणींची जोडी यात दिसून येते.

दरम्यान, आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजातील ‘वरात’ हे गाणं यावेळी सादर करण्यात आलं. वरात गाजवणारं हे गाणं अभिजित खणकर यांनी शब्दबद्ध केलं आहे. शिवाय,’गॅटमॅट’ चित्रपटातील सर्व गाण्यांना सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक समीर साप्तीस्करचं संगीत लाभलं आहे. राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव यांची निर्मिती असलेला हा चित्रपट, प्रेमात पडलेल्यांना आणि प्रेमात पडू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 2:41 pm

Web Title: trailer of film gatmet released watch video
Next Stories
1 …म्हणून तैमूर होणार चाहत्यांच्या दृष्टीआड
2 आर.के स्टुडिओच्या विक्रीसाठी कपूर कुटुंबीय करतेय ‘या’ कंपनीशी चर्चा
3 ‘बॉईज २’ च्या यशानंतर ‘बॉईज ३’ ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X