22 January 2021

News Flash

Video : विकीने दिली प्रेमाची कबुली, ‘ही’ होती आई-वडीलांची पहिली प्रतिक्रिया

विकीच्या आईला सुरुवातीपासूनच याविषयी कल्पना होती

विकी कौशल

‘मसान’, ‘संजू’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ अशा सुपरहिट चित्रपटातून घराघरात पोहोचलेला विकी कौशल सध्या लाखो तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाला आहे. ‘उरी’ या चित्रपटात विकीने केलेल्या अभिनयामुळे गेल्या काही दिवसापासून तो सतत चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटाच्या यशासोबतच त्याचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आलं आहे. विकी टीव्ही अभिनेत्री हरलीन सेठीला डेट करत असून त्याने अनेक वेळा त्याचं नातं जाहीरपणे मान्य केलं आहे. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्येही त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर एका कार्यक्रमामध्ये त्याने हरलीनविषयी आई-वडीलांना सांगितल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया कशी होती या गोष्टीचा खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वी विकीने ‘फेमसली फिल्मफेयर’ या शोच्या मंचावर हजेरी लावली होती. या शोमध्ये विकीने त्याच्या करिअर आणि नातेसंबंधांवर चर्चा केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे प्रेयसीविषयी पहिल्यांदाच घरी सांगितल्यानंतर आई-वडीलांनी कशी प्रतिक्रिया दिली हेदेखील त्याने अभिनयातून करुन दाखविलं.

कोणत्याही मुलाच्या किंवा मुलीच्या घरी त्यांच्या अफेअरविषयी समजलं की घरातल्यांची जी पहिली प्रतिक्रिया असते. तिच प्रतिक्रिया माझ्या घरातल्यांची होती. माझ्या प्रेयसीविषयी मी माझ्या आईला प्रथम सांगितलं. खरंतर तिला या गोष्टीची कल्पना होतीच,पण तिला माझ्याकडून जाणून घ्यायचं होतं. आईला माझ्या नात्याविषयी सविस्तर सांगितल्यानंतर तिने ही गोष्ट माझ्या वडीलांना सांगितली,असं विकीने सांगितलं.

पुढे तो असंही म्हणाला, माझ्या रिलेशनविषयी वडीलांना समजल्यानंतर माझ्यावर प्रचंड दडपण आलं होतं. मात्र माझे वडील ही गोष्ट ऐकल्यानंतर प्रचंड शांत होते. काही झालंच नाही असा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. फक्त मला त्यांनी एक सल्ला दिला तो म्हणजे, काही काळजी करु नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत. फक्त तू ज्या मुलीसोबत नात्यात आहेस तिचा आदर कर, असं माझे वडील म्हणाले होते.

दरम्यान, विकीने या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे विकीचं आई-वडीलांसोबत असलेलं चांगलं बॉंण्डिंगही यावेळी दिसून आलं.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 6:56 pm

Web Title: vicky kaushal enacts the whole scene when he told his parents about dating
Next Stories
1 माधुरी- आमिरच्या ‘दिल’ चा सीक्वलही येणार
2 Video : प्रेक्षकांना बेफिकर व्हायला लावणारा ‘आम्ही बेफिकर’चा टीझर
3 …म्हणून ‘गली बॉय’मधील रणवीर-आलियाच्या चुंबन दृश्याला सेन्सॉरची कात्री
Just Now!
X