छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोच्या १४ व्या सीझनची सुरुवात येत्या सप्टेंबर महिन्यात होईल असं म्हटलं जात आहे. दरम्यान या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता अध्ययन सुमनची. मात्र त्याने एक ट्विट करुन या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. जगाचा अंत होत आला तरी देखील ‘बिग बॉस’मध्ये जाणार नाही असं त्याने म्हटलं आहे.

अवश्य पाहा – विमानात सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

अवश्य पाहा – पंतप्रधान सहाय्यता निधीमधील पैशांच काय झालं?; बॉलिवूड संगीतकाराचा केंद्र सरकारला सवाल

अध्ययन सुमन हा अभिनेते शेखर सुमन यांचा मुलगा आहे. त्याला देखील बिग बॉसमध्ये भाग घेण्याबाबत विचारण्यात आलं होतं अशी चर्चा होती. मात्र त्या याबाबत खुलासा केला आहे. “मी बिग बॉसमध्ये जाणार ही खोटी बातमी आहे. माझा विचार केल्याबद्दल धन्यवाद. कलर्स वाहिनीने कृपया याबाबत अधिकृत खुलासा करावा.” अशा आशयाचे ट्विट त्याने केले. त्यानंतर त्याने आणखी एक ट्विट केले यामध्ये तो म्हणाला, “जगाचा अंत होत आला तरी देखील मी बिग बॉसमध्ये जाणार नाही. चाहत्यांनी चिंता करु नये. बिग बॉसमध्ये जाणं माझ्या करिअरचं ध्येय नाही.”

‘बिग बॉस’ हा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो आहे. त्यामुळे यामध्ये जाण्यासाठी अनेक कलाकार प्रयत्न करत असतात. या पार्श्वभूमीवर अध्ययन सुमनने घेतलेला हा निर्णय ‘बिग बॉस’ चाहत्यांना चकित करणारा आहे. अनेकांनी ट्विट करुन आपलं आश्चर्य व्यक्त केलं आहे. ‘बिग बॉस’चा तेरावा सिझन फार चर्चेत होता. टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने शोचं विजेतेपद जिंकलं होतं. तर असिम रियाज आणि शहनाज गिल दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते.