Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar: प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये १ मार्चपासून सुरू झालेला हा सोहळा ३ मार्चपर्यंत चालणार आहे. या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी राधिकाने एका खास पोशाखाची निवड केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकन अभिनेत्री ब्लेक लाइव्हलीने २०२२ रोजी मेट गालामध्ये एक डिझायनर ड्रेस परिधान केला होता. या सोहळ्यातील राधिकाचा पोशाखही ब्लेक लाइव्हलीने परिधान केलेल्या ड्रेससारखा होता. प्री-वेडिंगच्या कार्यक्रमातील पहिल्या दिवशी राधिकाने कस्टम-मेड वर्साचे (Versace) ब्रॅण्डचा गुलाबी रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला होता. डायमंड नेकलेस आणि इयररिंग्सची निवड करत राधिकाने हा लूक परिपूर्ण केला.

‘डाएट सब्या’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याचे फोटो शेअर करण्यात आले. या फोटोजला कॅप्शन देत त्यांनी लिहिले, “नववधूने परिधान केले कस्टम-मेड वर्साचे! म्युझियममध्ये ठेवण्यासारखा हा कस्टम मेड डिझायनर पीस पूर्वी केवळ ब्लेक लाइव्हलीसाठी बनविला गेला होता.”

हेही वाचा… मॉडेल दिशा पाटनीला अभिनेत्री होण्यास ‘या’ सेलिब्रिटीने केली मदत; अभिनेत्री म्हणाली, “लोक त्याच्याबद्दल जे बोलतात…”

राधिकाच्या या लूकचे फोटोज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यावर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले, “राधिकाने जो गाऊन घातला, तो मला प्रचंड आवडला.” तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले, “ब्लेकपेक्षा राधिकावरच हा ड्रेस खूप सुंदर दिसत आहे.”

हेही वाचा… लग्नानंतर आशीर्वाद घेण्यासाठी रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी पोहोचले अमृतसरला; सुवर्ण मंदिराजवळील फोटो केले शेअर

दरम्यान, राधिकाबद्दल सांगायचे झाल्यास, राधिका ही उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये तीन दिवस चालणाऱ्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये विविध क्षेत्रांतील बडे स्टार्स सहभागी झाले आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटला शुभेच्छा देण्यासाठी जगप्रसिद्ध गायिका रिहानाने काल खास लाइव्ह परफॉर्मन्स केला. प्री-वेडिंगनंतर १२ जुलैला या दोघांचा शाही विवाह सोहळा मुंबईत पार पडणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani radhika merchants pre wedding radhika opted for actor blake lively met gala versace dress at her pre wedding in jamnagar gujrat dvr
First published on: 02-03-2024 at 13:13 IST