scorecardresearch

कपूर खानदानाच्या चार पिढ्या एकाच फोटोत; पाहा सोनम-आनंदच्या मुलाची पहिली झलक

अनिल कपूर यांनी शेअर केलेल्या फॅमिली फोटोमध्ये वायुचा चेहरा स्पष्ट दिसतोय.

कपूर खानदानाच्या चार पिढ्या एकाच फोटोत; पाहा सोनम-आनंदच्या मुलाची पहिली झलक
(फोटो – अनिल कपूर यांच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

अनिल कपूर यांनी त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सोनम कपूर, आनंद आहुजांचा त्यांच्या बाळाबरोबरचा फोटोदेखील आहे. २० सप्टेंबर रोजी सोनम आणि आनंद यांनी त्यांच्या बाळाचं नाव जाहीर केलं होतं. त्यांनी बाळाचं नाव वायु कपूर आहुजा ठेवलंय. त्यावेळी त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये वायुचा चेहरा दिसत नव्हता. पण आता अनिल कपूर यांनी शेअर केलेल्या फॅमिली फोटोमध्ये वायुचा चेहरा स्पष्ट दिसतोय. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अनिल कपूर यांनी मंगळवारी २७ सप्टेंबर रोजी त्यांची आई निर्मल कपूर यांच्यासाठी वाढदिवसाची पोस्ट शेअर केली. “अद्भुत मुलगी, पत्नी, आई, आजी आणि आता पणजी, आज तिचा ८८ वा वाढदिवस साजरा करत आहेत! तुझ्यासारखा कोणीच नाही! वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!” असं कॅप्शन अनिल कपूर यांनी या फोटोंना दिलंय. या फोटोंमध्ये कपूर कुटुंबाच्या चार पिढ्या पाहायला मिळत आहेत.

अनिल कपूर यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच काहींनी फोटोंमध्ये सोनमचा मुलगा वायु दिसतोय त्यावरूनही कमेंट केल्या आहेत. दरम्यान, सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी २० ऑगस्ट रोजी त्यांच्या बाळाचं या जगात स्वागत केलं. त्यानंतर बरोबर एका महिन्यांनी म्हणजेच २० सप्टेंबर रोजी बाळाचं नाव ठेवलं होतं. अनिल कपूर यांच्या फॅमिली फोटोमध्ये चाहत्यांना अखेर वायु कपूर आहुजाचा चेहरा पाहायला मिळाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या