गेल्या काही दिवसांपासून सविता भाभी ही चर्चेत आहे. हे पात्र ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटातील आहे. खरतर एका अनोख्या पद्धातीने चित्रपटाचे प्रमोशन केल्यामुळे सोशल मीडियावर चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. नुकताच या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटातील मुख्य पात्र सविता भाई उर्फ सई ताम्हणकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चित्रपटातील गाण्याचा आहे. या गाण्याचे नाव ‘तुला बघाया जमंल गर्दी लांब, सविता भाभी तू इथंच थांब!’ असे आहे. हे गाणे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरल्याचे दिसत आहे.

an old lady dance on 90s famous song
90’s च्या गाण्यावर आजीने केला भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल
Ishan Kishan and Tim David Wrestling Video viral
IPL 2024: इशान किशन आणि टीम डेव्हिडचं चाललंय तरी काय? सराव सोडून दोघात रंगला कुस्तीचा फड, VIDEO होतोय व्हायरल
a husband put sticker on bike for wife
“सॉरी गर्ल्स, माझी पत्नी खूप..” दुचाकीवर नवऱ्याने लावले असे स्टिकर; व्हिडीओ होतोय व्हायरल
dance video
आयुष्य एकदाच मिळतं, फक्त मनभरून जगता आलं पाहिजे! वयाच्या नव्वदीत आजीने केला भन्नाट डान्स, ऊर्जा पाहून व्हाल थक्क
ukhane video a young girl said amazing ukhane for signle girls
VIDEO: “उखाणा घ्यायला अजुन मुलगाच मिळाला नाय…” सिंगल मुलींसाठी भन्नाट उखाणे, तरुणीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Kareena Kapoor Khans wax figure a woman first reaction goes viral on social media
VIDEO : करीना कपूरला पाहताच महिलेनी केले असे कृत्य…; व्हिडीओ होतोय व्हायरल
An old lady dance so gracefully
गौतमी पाटीलही आजीसमोर फिकी पडेल! भन्नाट डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव; डान्स व्हिडीओ व्हायरल
ola electric scooter driving in sea viral
“भाऊपण ओला, स्कूटरपण Ola…” या ‘नेक्स्ट लेव्हल टेस्टिंग’चा Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण!

या चित्रपटात अभय महाजन, पर्ण पेठे आणि सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचसोबत सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके, अमेय वाघ हे चेहरेही या चित्रपटात दिसणार आहेत. आलोक राजवाडे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.या चित्रपटाची निर्मिती गौरी आणि बनी डालमिया, सुरेश देशमाने, विनोद सातव यांनी केली आहे. हा चित्रपट येत्या ६ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.