अभिनेत्री भूमी पेडणेकर नवनवीन आणि वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आत्तापर्यंत तिने शुभमंगल सावधान, दम लगा के हैशा, बाला, टॉयलेट अशा समाजात उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयांवरचे चित्रपट केले आहेत. रिल आयुष्याप्रमाणे रिअल आयुष्यातही भूमी अशा महत्त्वाच्या विषयांवर बोलताना दिसत आहे.

आयएएनएस या माध्यमसंस्थेच्या वृत्तानुसार, नुकतंच तिने मासिक पाळीच्या दिवसादरम्यानच्या स्वच्छतेबद्दल मुलींमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठीच्या युनेस्कोच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला आहे. युनेस्को आणि महिलांसाठीच्या एका नामवंत ब्रँडने एकत्र येत #KeepGirlsInSchool ही चळवळ सुरु केली आहे. केवळ मासिक पाळीबद्दलच्या अज्ञानामुळे मुलींची शाळा बंद होणं आणि त्यांच्या स्वप्नांवर बंधनं येणं चुकीचं आहे. यासाठी मासिक पाळीबद्दल जागृती करणाऱ्या आणि मुलींना शिक्षण देणाऱ्या या चळवळीसोबत आपण काम करत असल्याचं भूमी म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi (@bhumipednekar)

तसंच या चळवळीत आपलं योगदान देण्याचं आवाहनही तिने सर्वांना केलं आहे. मासिक पाळी ही गोष्ट नॉर्मल करून त्याबदद्ल मुलींना, महिलांना सुशिक्षित करणं गरजेचं आहे. केवळ या कारणासाठी मुलींची शाळा सुटू नये असं मतही तिनं व्यक्त केलं आहे.