आज आणि उद्या आपण जाणून घेणार आहोत मधुबालाच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ कलाकृती ‘मुघल-ए-आझम’ बद्धल. पण सगळ्यात धक्कादायक बातमी मी आधीच सांगतो, हा सिनेमा अकबर बादशहाची थोरवी दाखवण्यासाठी निर्माण केलेला असूनसुद्धा पृथ्वीराज कपूरसारख्या कसलेल्या अभिनेत्यासमोर तोडीस तोड अभिनय करत जिने अख्खा सिनेमा खाल्ला, ती मधुबाला या सिनेमासाठी निवडली गेलेली शेवटची कलाकार होती. या सिनेमाला पूर्ण व्हायला एका तपापेक्षाही (१२ वर्ष म्हणजेच एक तप) जास्त काळ लागला, १९५३ मधे अनारकलीची भूमिका स्वीकारणारी मधुबाला २० वर्षांची होती आणि सिनेमा ऑगस्ट १९६० मधे प्रदर्शित होईस्तोवर ती साडे सत्तावीस वर्षांची होऊन गेली होती. सिनेमाचं काम सुरु होताना ती आणि दिलीप कुमार एकमेकांचे प्रेमी आशिक होते आणि सिनेमा प्रदर्शित होईस्तोवर खर्‍या आयुष्यातील या सलीम—अनारकलीची विदारक ताटातूट झालेली होती. हा सिनेमा बनायलाच एवढा काळ लागला, मग त्याची संपूर्ण माहिती सांगणारे लेख किती मोठे व सखोल असतील याचा विचार रसिक वाचकहो, तुम्ही करा आणि पुढील इशारा वाचून मगंच काय ते ठरवा.

‘वैधानिक इशारा, ‘मुघल-ए-आझम’च्या घडणावळीची ही रंजक हकीगत खूप मोठी आहे. प्रत्येक लेख एकदा वाचायला घेतल्यावर पूर्ण झाल्याखेरीज उठवणार नाही. तेव्हा एवढा वेळ हाताशी असेल तेव्हाच हे लेख वाचायला घ्यावेत’.
तर मंडळी, या इशार्‍यानंतर मी ‘मुघल-ए-आझम’च्या घडणावळीची ही रंजक हकीगत सुरु करतो….

A 19-year-old girl, Ayesha Rashid
…फिर भी दिल है हिंदुस्तानी! पाकिस्तानमधील १९ वर्षीय आयेशावर भारतात यशस्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया!
Korean woman beautifully perform indian classical dance
कोरियन तरुणी भारतीय नृत्यावर थिरकली! तिचे शास्त्रीय नृत्य पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
Sultan Bathery -Wayanad, Kerala
विश्लेषण: भाजपाला नाव बदलायचे आहे त्या सुलतान बथेरी शहराचा इतिहास नेमका काय सांगतो?
What Samantha Said?
‘निरागस पतीला का फसवलंस?’, ट्रोलरच्या प्रश्नावर समांथाचं रोखठोक उत्तर, म्हणाली..

१९४०-५० या काळात नजीर नावाचे एक नामवंत नट होते. पूर्वीचं टी.टी.सर्कल आणि आताचं खोदादाद सर्कल येथे चरित्र अभिनेता जीवन (म्हणजे तेजाबमधील भुंकणारा खलनायक किरणकुमार याचा बाप) आणि अभिनेता प्रेम अदीब यांचं एक भागीदारीतील हॉटेल होतं. चित्रपट सृष्टीतील इतर मंडळींप्रमाणेच नजीरही मोकळ्या वेळेत त्या हॉटेलला भेट देत, सोबत स्वत:चा १६-१७ वर्षांचा भाचा करीमुद्दीन यालाही आणत. सिनेक्षेत्राचं विलक्षण वेड असल्याने करीमला नजीरनी अत्रे पिक्चर्सच्या टेलरिंग डिपार्टमेंटला चिकटवून टाकलं होतं. पण मोठी स्वप्नं पहाणार्‍या करीमला स्वतंत्र व्यवसायाच्या वेडानं झपाटल्याने त्याचं मन नोकरीत रमेना. मग या खोदादाद सर्कलच्या हॉटेलशेजारीच नजीरनी करीमला लेडीज टेलरिंगचं दुकान थाटून दिलं. पण इथंही तो फार काळ रमला नाही. आपलं काम आटोपून तो या हॉटेलमधे यायचा — जो चित्रपट सृष्टीशी संबंधित कलाकारांचा अड्डा बनला होता. मामाच्या शिडीने चित्रपटसृष्टीत शिरण्याचं उदात्त स्वप्नं पहाणारा करीम मोठमोठ्या बाता- बढाया मारयचा, “अरे , मला चान्स देऊन बघा, असले भारी भारी चित्रपट काढतो की देखते रहना.”. ‘पोरिबाळींची मापं काढणार्‍या लेडीज टेलरला चित्रपटातलं काय कळतं?’ अशी त्याची टिंगल—टवाळी व्हायची…..

पण एक झालं….. भाच्याच्या या वेडापुढे हात टेकून नजीरनं त्याला आपल्यासोबत स्टुडिओत न्यायला सुरुवात केली. असंच भटकंतीत असताना करीम ताडदेवच्या फेमस फिल्म्स लॅब नावाच्या चित्रपटसंस्थेच्या मालकांना म्हणजे के.अब्दुल्ला आणि सिराज अली हकीम यांना भेटला. करीमच्या भन्नाट कल्पनांनी भारावलेल्या सिराजनं करीमला चित्रपट निर्मितीसाठी भांडवल द्यायचं कबूल केलं आणि ‘लेडीज टेलर शॉपला टाळं लागलं’…

फेमस फिल्म्स बॅनरखाली करीमनं पहिला चित्रपट काढला. मुस्लीम पार्श्वभूमीचं कथानक, उत्तमोत्तम सेट्स, पन्नास हजाराच्या खाली कामाला हात न लावणारी वीणा ही नटी नायिका म्हणून, पृथ्वीराज कपूर, याकूब, वास्ती आणि आगा , दुय्यम नायिका सुरैय्या, सितारादेवी असे नट—नट्या, लाख रुपये मानधन घेणारा संगीतकार गुलाम हैदर या सार्‍यांचं जबरदस्त मिश्रण होत एक ‘फूल’. हा चित्रपट तुफान हिट ठरला पूर्वी कुठल्याही चित्रपटाने इतके पैसे मिळवून दिले नव्हते म्हणून सिराज अली प्रचंड खूष झाला आणि त्याने या लेडीज टेलर करीमच्या हातात सही केलेला कोरा चेक दिला.
माझ्या प्रिय वाचकांनो, या १४ जून १९२२ रोजी म्हणजे ९६ वर्षांपूर्वी जन्मलेल्या लेडीज टेलरचं संपूर्ण नांव होतं ‘करीमुद्दीन असीफ ऊर्फ के.असीफ’.

‘जीवनातील सर्वश्रेष्ठ स्वप्नपूर्तीची खडतर वाटचाल’

माझ्या प्रिय वाचकांनो, वर आपण पाहिलं की वाल्याचा वाल्मिकी कसा झाला. (फक्त उपमालंकार म्हणून वाचावं, उगीच ‘मराठी/ हिंदू अस्मिता’ वगैरे खडबडून जागी नको व्हायला.) इथून पुढे आपण या कलाकाराचा करीमुद्दीनचा उल्लेख टंकलेखन सोयीसाठी ‘के’ असा करुया.
‘फूल’च्या यशानंतर के. नं ‘हीर रांझा’ ची घोषणा केली, पण ती कागदावरंच राहिली. कारण इम्तियाज अली ताज नावाच्या एका नाटक लेखकानं ‘मुघल—ए—आझम’ नावाच्या नाटकाचं हस्तलिखित के. च्या हातात ठेवलं. लखनौमधे जिची कबर असल्याचं ऐकिवात आहे , त्या मोघल सम्राटाच्या जनानखान्यातील अनारकली नामक एका असामान्य रुपाची नृत्यसुंदरी यावर बेतलेलं ‘मीयाँ मूठभर दाढी हातभर’ पठडीतील एक संहिता. पण सारी चित्रपटसृष्टी अवाक् होऊन जाईल असा एक भव्यदिव्य चित्रपट निर्माण करायचं मनाशी ठरवलेल्या स्वप्नवेड्या के ला त्याच्या जगण्याचं कारण सापडलं, ते कारण होतं, ‘मुघल—ए—आझम’.

‘फूल’ च्या यशानंतर के च्या असामान्य कर्तृत्वावर भाळून सिराज अलीनं ‘लागेल तेवढा खर्च कर, पण पुन्हा कुणी धाडंस करु नये असा चित्रपट निर्माण कर.’ असं के ला सांगितलं. झालं… वारं प्यायलेलं के नावाचं शिंगरु सुसाट उधळलं ना रांव. ‘पाच दहा लाखात असा चित्रपट बसवणं म्हणजे क्विंटलच्या पोत्यात टनभर साखर किंवा उंदराच्या पिंजर्‍यात हत्तीला ठेवा म्हणण्यासारखं आहे, मी असली कामं करत नाही.’ असं जाहिरपणे बोलण्याइतका फटकळपणा के दाखवू लागला.

१९४८—१९५० या दोन वर्षांत के नं पटकथा लेखनासाठी शोधकाम सुरु केलं व संपवलंही. ‘मुघल—ए—आझम एकमेवाद्वितीय हवा, गल्लाभरू लोकांच्या पठडीतली चार दिवसांत लिहिली जाणारी पटकथा नको, कितीही काळ लागो, पटकथा उत्कृष्टंच झाली पाहिजे.’ हा परफेक्शनिस्ट के चा अट्टाहास होता. पटकथा आवडली नाही म्हणून ‘नही यार, ये तुम्हारे बस की बात नही.’ असं म्हणंत पण फूल—ना—फुलाची पाकळी म्हणून सुयोग्य मानधन हातावर टेकवत तीन पटकथाकारांना के नं त्याच्यालेखी ‘पैगंबरवासी’ करून टाकलं होतं.
‘इकडे…..’
ख्वाजा अहमद अब्बास ऊर्फ के.ए.अब्बास या माणसानं सय्यद अमीर हैदर कमाल नक्वी या नावाच्या माणसाकडनं १९४९ साली रिलीज झालेल्या ‘महल’ ची पटकथा लिहून घेतली होती. A to Z सदरातलं ‘सय्यद अमीर हैदर कमाल नक्वी’ या ‘कमाल’ माणसाला तो ‘अमरोहा’ गावचा असल्यानं के.ए.अब्बासनं ‘कमाल अमरोही’ असं सुटसुटित नांव सुचवलं. के चा ‘पटकथा लेखक शोध अखेर कमाल अमरोहिंपाशी येऊन थांबला.’

मंडळी हाच तो मीनाकुमारीचा नवरा कमाल अमरोही , ज्याच्या नावाचा स्टुडिओ मुंबईत जोगेश्वरी—पवई लिंक रोडवर L&T Powai च्या अलिकडे फर्लांगभर अंतरावर डाव्या हाताला लागतो.

या चित्रपटाचा गाभा म्हणजे ‘संवाद’ हे जाणून, पटकथा तयार झाल्यावर के नं कमाल अमरोहिंसोबत उर्दू मिश्रित हिंदी संवाद लिहिण्यासाठी ‘एहसान रिझवी, वजाहत मिर्झा आणि अमानुल्ला खान (झीनत अमानचे वडील)’ या तीन नामवंत लेखकांना पाचारण केलं. या चौघांनीही परस्परांशी सुसंवाद साधत अजरामर संवाद लिहित ‘मुघल—ए—आझम’ पूर्ण केला.

मंडळी अशा प्रकारे ‘मुघल—ए—आझम’नामक भव्य कलाकृतीचा पाया तयार झाला. आता वळूया ‘मुघल—ए—आझम’ या सांगितीक प्रवासाकडे.

मंडळी, नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्नं आणि इथे तर ‘न भूतो न भविष्यति.’ अशा अनारकलीची जगावेगळी चित्तरकथा घडवू घातली होती के नं. कथा — पटकथा — संवाद हा त्रिवेणी संगम तर जुळवून झाला होता. आता चित्रपटाच्या संगीताकडे के नं लक्ष केंद्रित केलं.
अगदी अलिकडे नावारुपाला येणार्‍या अनिल विश्वासची संगीतकार म्हणून नियुक्ती करण्यात आली. १—२ गाणी ध्वनिमुद्रितही झाली. पण ती के ला तशी सामान्यंच वाटल्यानं त्यानं अनिल विश्वासना कामातून मुक्त केलं.

आता के नं त्याकाळी फारशा नावारूपाला न आलेल्या सज्जाद हुसैनला पाचारण केलं. पण झालं काय की, के चा असा (‘गैर’) समज होता की त्याला सिनेमाच्या सर्व अंगांची उत्तम जाण आ , म्हणून तो सज्जादला पार्श्वसंगीत, गीतांच्या चाली, फार कांय — ऑर्केस्ट्रेशनसंबंधीही सारख्या सूचना देऊ लागला. हे अगदीच असह्य होऊन सज्जाद हुसैननं बाहेरचा रस्ता पकडला.

‘मुघल—ए—आझम’ हा संथगतीने होणार असल्याची खात्री असल्यानं के नं दिलीपकुमार—नर्गीसला घेऊन ‘हलचल’ नावाचा चित्रपट काढला होता, तेंव्हाही सज्जाद असाच बाहेर पडला व मोहम्मद शफी या संगीतकारानं बाकीचं काम पूर्ण केलं होतं. आताही शफीला पाचारण करण्यात आलं.पण स्वत:ला व्ही.शांताराम किंवा राजकपूर समजणार्‍या के ला शफीचं संगीत रुचेना आणि शफीला के ची माजोरी पचेना. शेवटी शफी पण बाहेर पडला.
याच सुमारास ‘आन’ या चित्रपटातलं नौशादचं ‘दिलमें छुपाके प्यारका तूफान ले चले , हम आज अपनी मौतका सामान ले चले, मौतका सामान ले चले’ हे घोड्याच्या टापांच्या ठेक्यावरचं गाणं प्रत्येकाच्या ओठांवर घोळत होतं. के नं नौशादना विनंती केली. पण के ची मुजोरी सर्वश्रुत असल्यानं नौशादनी के ला फटकारलं की ‘असीफभाई, माझा माझ्या कर्तृत्वावर आणि क्षमतेवर संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला माझ्या कामात मला कुणाचीही — अगदी निर्माता—दिग्दर्शकाचीही ढवळाढवळ चालंत नाही. खेरीज माझं अाणि शकील बदायुनीचे सूर झकास जुळले अाहेत.त्यामुळे माझ्यासोबत शकीललाहि गीतकार म्हणून घ्यावं लागेल.या माझ्या अटी मान्य असतील तरंच पुढचा विचार करता येईल, अन्यथा मला माफ करा.’

आश्चर्याची गोष्ट म्हणजे परफेक्शनीस्ट के नं हे सगळं मान्य केलं . (हे आपल्यासारख्या ‘कानसेनांचं नशीब.’) मंडळी, शकील बदायुनी आणि नौशाद या जोडीनं ‘मुघल—ए—आझम’च्या यशातला किती वाटा उचललाय हे म्या पामराने सांगायची आवश्यकता नाही. पण नौशादचं एक कौशल्य जाता जाता सांगवल्याशिवाय रहावंत नाही म्हणून सांगतो (व्यवसायाने एक इंजिनिअर असल्याने या तांत्रिक गोष्टीचा उल्लेख अत्यावश्यक आहे.)

असं म्हटलं जातं की, प्यार किया तो डरना क्या या गाण्यातलं आवाज घुमण्यामागचं रहस्य हे आहे की त्याकाळी Echo Recording तंत्रज्ञान प्रगत नसल्यानं नौशादनं ते गाणं लताकडून एका स्टुडिओच्या न्हाणीघरात म्हणजे बाथरूममधे गाऊन घेतलं होतं. सलाम नौशादच्या असामान्य प्रतिभेला .

‘परफेक्शनीस्ट के. असीफ’
मंडळी, मी तुम्हाला अनेकदा के हा परफेक्शनीस्ट असल्याचं म्हटलंय. त्याचे अनेक दाखले आता तुम्हाला वाचायला मिळतील.हा भाग कलाकारांची निवड याविषयी असल्याने इतर लेखांपेक्षा बराच मोठा आहे .

हा चित्रपट ज्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेवर आधारित आहे, त्या व्यक्तिरेखेची — अनारकलीची भूमिका करणारी कलाकार सगळ्यात शेवटी नक्की केली गेली. १९४८ च्या सुमारास चित्रपटाचं बीज के च्या भन्नाट डोक्यात रोवलं गेलं. तेव्हा अनारकलीसाठी सुरैय्या, वीणा व नर्गिस अशी तीन नावं के च्या नजरेसमोर होती. त्यापैकी सुरैय्याचं सौंदर्य आणि आवाज दोन्ही उतरणीला लागलंय असं वाटल्यानं के नं त्यावर फुली मारली. वीणा मुसलमान खानदानातील सौंदर्यवती होती हे वादातीत, पण अनारकली साठी के ला अपेक्षित विनयशील लोभसपणा व लावण्य तिच्याकडे नाही म्हणून तिचं नांव के नं मनातून काढून टाकलं. नर्गिस हि लावण्यवती खचितंच नव्हती, पण तिचा अभिनय वादातीत होता. म्हणून के नं तिला विचारलं. परंतु इथेही त्याचं दुर्दैव (आणि माझ्यासारख्या तमाम रसिक डोळंस प्रेक्षकांचं सुदैव’) आडवं आलं. झालं काय की, ‘मुघल—ए—आझम’ हा एक दीर्घ ‘मुदत—ए—चित्रम्’ होणार असल्याने के नं दिलीपकुमार व नर्गिसला घेऊन ‘हलचल’ नावाचा चित्रपट काढला व त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिलीपकुमारनं नर्गिसला अभिनयाबाबत अवाजवी शिकवण्याचा प्रयत्न केला व याला कंटाळून नर्गिसनं ‘यापुढे मी दिलीपकुमार सोबत एकही चित्रपट करणार नाही’ असं जाहिर केलं .

आता अनारकलीसाठी पुन्हा पाढे पंचावन्न…..
१९५२ फेब्रुवारीच्या ‘स्क्रीन’ साप्ताहिकात जाहिरात ‘१६ ते २२ वयोगटातील सुंदर आकर्षक तरुणींनी ‘मुघल—ए—आझम’ या आगामी चित्रपटातील अनारकलीच्या भूमिकेसाठी आपले पोर्टफोलिओज् येथे पाठवावेत. Sterling Investment Corporation या निर्मिती संस्थेचे झैदी हे प्राथमिक चाचणी दिल्ली, कलकत्ता, लखनौ, हैद्राबाद या शहरात घेतील. यातून निवडलेल्या तरूणींची चाचणी मुंबई कार्यालयात दिग्दर्शक के. असीफ व दिलीपकुमार घेतील. अनारकली आणि इतर भूमिकांसाठी या दोघांचा निर्णय अंतिम असेल. सर्वांगसुंदर व अभिनयातील जाणकार युवतीला अनारकलीच्या भूमिकेसाठी निवडण्यात येईल.’

या जाहिरातीच्या प्रतिसादात्मक सुमारे ६,५०० अर्जांतून पाचशे तरुणींची प्राथमिक चाचणी घेऊन त्यातून फक्त पाच तरुणी झैदींनी निवडल्या. मुंबईतील अंतिम चाचणीत दिल्लीच्या ‘शीला दलाया’ नामक कॉलेजकुमारीची निवड झाली. के नं तिची स्क्रीन टेस्ट घेतली, नंतर अनारकलीच्या जीवनातील निवडक प्रसंगांचं शूटिंग व डबिंगही करण्यात आलं. पण परफेक्शनीस्ट के ला तिच्या भावमुद्रा, देहबोली आणि इंग्रजीची झांक असलेले उर्दू उच्चार पसंतीस उतरेनात. आणि मग ‘शीला की जवानी’ अनारकली ऐवजी अनारकलीच्या धाकट्या बहिणीला बहाल झाली.
परत ‘अनारकली’ ढगात…..

आता नगीना वगैरे चित्रपटांतून नावारुपाला आलेली अभिनय ‘समर्थ’ (व शोभना ‘समर्थ’ कन्या) अभिनेत्री ‘नूतन’ हिचं नांव पुढे आलं. पण या सुवर्णसंधीला नाकारंत खुद्द नूतननंच सुरुंग लावला. एका आघाडीच्या सिनेसाप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत नूतन अत्यंत नि:संदिग्ध अन् परखड शब्दांत म्हणाली,” ‘अनारकली सर्वार्थाने शोभणारी एकंच अभिनेत्री हिंदी सिनेसृष्टीत आहे आणि ती आहे मधुबाला.’ (माझ्या प्रिय वाचकांनो, तमाम हिंदी चित्रपटसृष्टीमधे इतकं Best Self Analytical Mind अाजपर्यंत माझ्या पहाण्यात नाहि . या एका वाक्यात नूतननं ‘ती फक्त दिसायलाच भाबडी , निष्पाप नव्हती , तर मनानंहि तितकीच निष्पाप होती’ हे सिद्ध केलं) सौंदर्य, लाघवी आणि आर्त असे हावभाव आणि मार्दव याचा त्रिवेणी संगम असलेल्या मधुबालाविषयी के चं अजिबात दुमत नव्हतं. पण खरी ग्यानबाची मेख वेगळीच होती. ‘महल’च्या यशामुळं मधुबालाला प्रचंड मागणी होती आणि तिच्या मानधनाची रक्कम तिचे सर्व व्यवहार पाहणार्‍या अताउल्ला खान (खरं तर ‘त’ ता ‘यी’ उल्लाखान) या बापाच्या हव्यासापायी आकाशाला भिडली होती. त्यामुळे के नं तूर्तास हा विषय बाजूला ठेवला.

सलीमच्या भूमिकेसाठी दिलीप कुमारचं नाव सुरुवातीला सुचवण्यात आलं होतं. पण, तेंव्हा तो काटकुळा, पोरगेलासा आणि नवखा असल्यानं गोर्‍या घार्‍या चंद्रमोहनला निवडण्यात आलं. बहार या सलीमच्या प्रेयसीची भूमिका के नं आपली पत्नी सितारादेवी (जी आधी त्याची मामी होती, जिच्याशी त्याने मामाला परत ‘मामा’ बनवून लग्न केलं होतं.) हिला दिली होती. दुर्जनसिंहची भूमिका अजितला दिली. जोधाबाईच्या भूमिकेसाठी दुर्गा खोटेंना करारबद्ध केलं. अकबराच्या भूमिकेसाठी सप्रू ला निवडलं.

तर मंडळी आता या स्टारकास्टची परंत कशी विल्हेवाट लागली आणि के नं मानसिक स्तरावंर झालेली किती आक्रमणं लिलया पेलली आणि पुरून उरला ते बघा.

अतिमद्यपानानं चंद्रमोहन अचानक वारला. तोवर दिलीप कुमार अंगापिंडानं भरला होता, त्याला सलीमची भूमिका देऊ केली तर अकबर—अनारकलीवरंच दरोमदार असल्यानं सलीमची भूमिका दुय्यम असल्यानं दिलीप कुमार हटून बसला. के नं ‘कमालला सांगून मी या भूमिकेला लिफ्ट देतो, पण या गहिर्‍या रंगांच्या अजरामर होऊ घातलेल्या भूमिकेला तू नाकारू नकोस.’ असा सार्थ विश्वास दिलीप कुमारला दिला. चला…..सलीम बसला घोड्यावर..

सप्रू अनेक चित्रपटात कामं करत असल्यानं अकबराची भूमिका पृथ्वीराज कपूर कडे आली.

मध्यंतरी, के च्या विचित्र आणि विक्षिप्त स्वभावाला कंटाळून के ची बायको सितारादेवी त्याच्या जीवनातून व बहारच्या भूमिकेतून बाहेर पडली. नुकत्याच के च्या जीवनात नवी बायको म्हणून प्रवेश केलेल्या निगार सुलतानानं बहारची भूमिका पटकावली (आठवा’: तेरी मेहफिलमें किस्मत आजमाकर हमभी देखेंगे.)

दास्तान-ए-मधुबाला भाग ४

आता सांगतो मी या चित्रपटाच्या अनारकलीच्या एन्ट्रीविषयी…..
‘जिच्या सौंदर्याच्या तेजोवलयामधे तिच्या सहजसुंदर अभिनयाचं , भावमुद्रांचं कौशल्य झाकोळून गेलं असं एक शापित सौंदर्य. मुमताज जहान देहलवी ऊर्फ देविकारानींनी जे नांव तिला बहाल केलं ती मधुबाला.’

दिलीप—मधुबालाचं प्रेमप्रकरण रंगू लागलेलं. त्यामुळे आपल्या या अलौकिक चित्रपटाच्या एकमेवाद्वितीय अनारकलीसाठी मधुबालाकडे शब्द टाकायची विनंती के दिलीपला केली. दिलीपनं सूतोवाच केल्यावर मगंच के अताउल्ला खानला भेटायला गेला. के च्या सढळ हाताच्या कथा सर्वश्रुत होत्या, त्यामुळे अताउल्लाने ढीगभर अटी घालत आकडा सांगितला ‘पाच लाख.’ यावर ‘पागल हो गए हो क्या? पांच लाखात मला तीन नामांकित नट्या मिळतील. येतो मी…’ असं म्हणंत के तिरमिरीत जायला निघाला. तेव्हा आतापर्यंत गप्प बसलेली मधुबाला म्हणाली , ‘ठहरिये असीफ साहाब, मैं आपका पिक्चर जरुर साईन करुँगी. जो आप देना चाहते हो दे दो, पर मेरे मिजाजके माफिक मेहनताना हो तो बेहतर होगा.’
के ला तर लॉटरीच लागली, दारातून माघारी फिरत आणलेल्या थैलीतील लाखभर रुपये टेबलवर ठेवत के म्हणाला, ‘ये तो अॅडव्हान्स है, और दो लाख मैं तुम्हें दे सकूँगा.’ आणि लाखभर रुपयांची पावतीही न विचारता ‘माझा दिवाणजी बाकी फॉरमॅलिटीज् पूर्ण करून जाईल.’ म्हणंत बाहेर पडला. अशा तर्‍हेने १९५३ साली अनारकली म्हणून २० वर्षीय मधुबालाचा ‘मुघ—ए—आझम’ मधे सगळ्यात शेवटी शिरकाव झाला .

दास्तान-ए-मधुबाला भाग- ५

मंडळी के.असिफ परफेक्शनिस्ट होता, त्यामुळे इतरांना तो चक्रम आणि विक्षिप्त वाटला असेलही पण तो तितकांच वफादार, दिलदार होता. आणि मधुबालाही अत्यंत प्रामाणिक, इमानदार होती. ‘तीन लाख ही ठरलेली बिदागी असूनही मधुबालाला शेवटचा हप्ता देताना के नं पंचवीस हजाराची भर घालून चेक मधुबालाला सुपूर्द केला.’ असं नेमकं कांय घडलं की के नं पंचवीस हजार म्हणजे १२.५% रक्कम जास्त द्यावी? मंडळी, हे जाणून घेऊया पुढील भागात…..