अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं आहे. दोघांच्याही लग्नाला १५ वर्ष झाली आहेत. पण या दोघांच्या पहिल्या भेटीचा किस्सा फारच खास आहे. एकदा अभिषेकने त्याची ऐश्वर्याशी पहिली भेट कुठे आणि कशी झाली होती, याबद्दल खुलासा केला होता. खरं तर जेव्हा अभिषेक-ऐश्वर्याची पहिली भेट झाली तेव्हा ते दोघेही दुसऱ्या व्यक्तींबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. ऐश्वर्या सलमान खानबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. तर अभिषेक बच्चन करिश्मा कपूरला डेट करत होता.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची पहिली भेट स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. येथे ऐश्वर्या राय बॉबी देओलबरोबर ‘और प्यार हो गया’ या चित्रपटाचे शूटिंग करत होती आणि अभिषेक एका चित्रपटाचे लोकेशन पाहण्यासाठी आला होता. तेव्हा अभिषेक अभिनेता म्हणून नाही, तर प्रॉडक्शन बॉय म्हणून काम करत होता. बॉबी-अभिषेक लहानपणापासूनचे मित्र होते. एकाच ठिकाणी असल्यामुळे त्यांनी भेटण्याचे ठरवले. इथेच बॉबीने ऐश्वर्या रायची अभिषेकशी ओळख करून दिली होती.

elon musk postpones trip to india
‘टेस्ला’चे मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर; वर्षअखेरीस भेटीचे सुतोवाच
Randeep Hudda Post
सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याची हत्या, रणदीप हुडाने मानले अज्ञात मारेकऱ्यांचे आभार, पोस्ट शेअर करत म्हणाला..
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी

हेही वाचा – “ती अतिशय…” शम्मी कपूर यांची एक अट अन् मुमताज यांनी संपवलं होतं नातं

अभिषेक तेव्हाची आठवण सांगत म्हणाला, “बॉबी देओल माझा चांगला मित्र होता. तो त्याचा पहिला चित्रपट ‘और प्यार हो गया’चं शूटिंग करत होता, मीही त्याच ठिकाणी होतो आणि त्याला भेटायला गेलो होतो. तेव्हा त्याने मला डिनरसाठी बोलावलं. हा ऐश्वर्याचा पहिला हिंदी चित्रपट होता आणि मी तिच्याशी भेटण्याची, बोलण्याची ती पहिलीच वेळ होती.”

हेही वाचा – अरबाज खानचं गर्लफ्रेंडशी ब्रेकअप? जॉर्जिया एंड्रियानीच्या वक्तव्याने चर्चांना उधाण; म्हणाली, “आमचं नातं….”

पुढे अभिषेक म्हणाला, “जेव्हा ती याबद्दल बोलते, तेव्हा ती गंमतीने म्हणते, ‘त्यावेळी तू काय म्हणत होतास, त्यातला एक शब्दही मला समजला नव्हता. कारण मी विचार करत होते की हा इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलेला मुलगा, नंतर बोस्टनला गेला, त्यामुळे याचे इंग्रजी उच्चार अधिक स्पष्ट आणि उत्तम असतील तसेच भाषेवर प्रभुत्व असेल असं मला वाटलं होतं.’ पण मी त्यावेळी बोलत होतो, त्यातलं तिला काहीच कळत नव्हतं, त्यामुळे ती कायम विचारते की ‘त्यावेळी तू काय म्हणत होतास?” अशी आठवण अभिषेकने सांगितली.

हेही वाचा – “मी गरोदर असल्याचं कळताच पालकांनी…” नीना गुप्तांनी सांगितली जुनी आठवण

दरम्यान, काही काळाने ऐश्वर्या व अभिषेकचे त्यांच्या आधीच्या पार्टनरबरोबर ब्रेक अप झाले. दोघेही एकमेकांना भेटत असायचे. त्यांनी ‘गुरू’, ‘उमराव जान’ आणि ‘धूम २’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. ‘गुरु’ चित्रपटाच्या टोरंटो प्रीमियरमध्ये अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले आणि ऐश्वर्याने लगेच होकार दिला. नंतर दोघांनी २० एप्रिल २००७ रोजी अमिताभ यांच्या ‘जलसा’ बंगल्यावर मोठ्या थाटामाटात लग्न केले. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव आराध्या आहे.