Bade Miyan Chote Miyan total box office collection : अक्षय कुमार व टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका असलेला अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करेल, अशी अपेक्षा निर्मात्यांना होता. पहिल्या दोन दिवसांची कमाई पाहता चित्रपट सुपरहिट होईल, असं वाटलं होतं. पण नंतर मात्र या चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घट झाली आणि आता आठ दिवसांनी चित्रपटाला प्रेक्षक मिळत नसल्याची परिस्थिती आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’चं कलाकारांनी जोरदार प्रमोशन केलं होतं, पण थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर अक्षय-टायगरचा ॲक्शन थ्रिलर प्रेक्षकांची मनं जिंकू शकला नाही. त्यामुळे हा चित्रपट कमाईच्या बाबतीत खूपच मागे पडला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे, पण तो बजेटच्या निम्मीही कमाई करू शकला नाही. आता चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे समोर आले आहेत.

बॉलीवूड अभिनेत्याने शेअर केले रवी किशन यांचे कथित पत्नी व मुलीबरोबचे फोटो, म्हणाला….

‘सॅकनिल्क’ च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ने रिलीजच्या आठव्या दिवशी १.६० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचं एकूण कलेक्शन आता ५०.१५ कोटी रुपये झालं आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.६५ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी ७.६ कोटी, तिसऱ्या दिवशी ८.५ कोटी, चौथ्या दिवशी ९.०५ कोटी, पाचव्या दिवशी २.५ कोटी, सहाव्या दिवशी २.४ कोटी, सातव्या दिवशी २.५५ कोटी, आठव्या दिवशी १.६० कोटी रुपयांची कमाई केली.

“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”

३५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला फारशी चांगली कमाई केली नव्हती, त्यामुळे आता दुसऱ्या वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत काय बदल दिसतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. सध्याची परिस्थिती पाहता बजेटच्या निम्मेही पैसे वसूल होणार नाही असं दिसतंय. याचबरोबर अक्षय कुमार टायगर श्रॉफ यांच्या नावावर आणखी एका फ्लॉप चित्रपटाचा ठपका लागला आहे. या चित्रपटात अक्षय व टायगरसह, पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ व रोनित रॉय बोस यांच्याही भूमिका आहेत.