अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा जामनगरमध्ये थाटामाटात पार पडला. या सोहळ्यासाठी फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. १ ते ३ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याची खूप चर्चा झाली. या सोहळ्यात शेवटच्या दिवशी आंतरराष्ट्रीय गायक अॅकॉनने परफॉर्म केलं, त्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

‘वरिंदर चावला’ या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओत अॅकॉन परफॉर्म करताना तिथे स्टेजवर अनंत अंबानी व सलमान खान दिसत आहेत. यावेळी अनंत सलमान खानला उचलण्याचा प्रयत्न करतो, पण तो अभिनेत्याला उचलू शकत नाही. मग अनंत सलमानचा बॉडीगार्ड शेराला हाक मारून बोलावतो आणि सलमानला उचलून घ्यायला सांगतो. शेराने सलमानला उचलून घेतल्यावर अनंत व सलमान दोघेही अॅकॉनच्या गाण्यावर डान्स करतात. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Video: अभिषेक बच्चनने ऐश्वर्या व लेकीसह केलं एंजॉय; आराध्याचा नवा लूक पाहून नेटकरी म्हणाले…

दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये सलमान खान अॅकॉनबरोबर ड्रम वाजवताना दिसतो. नंतर अनंत तिथे येतो आणि सलमानबरोबर ड्रम वाजवतो. या तिघांच्याही परफॉर्मन्सला उपस्थित सर्वजण टाळ्या वाजवून दाद देतात. अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Video: हम साथ साथ है! बच्चन कुटुंबाच्या तीन पिढ्यांची एकत्र अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला हजेरी, जया बच्चन मात्र…

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्टार अॅकॉनबद्दल बोलायचं झाल्यास त्याने ‘छम्मकछल्लो’ हे बॉलीवूड गाणं गायलं होतं. या गाण्याची खूप चर्चा झाली होती. तेच गाणं त्याने अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये गायलं. या गाण्यावर शाहरुख खान लेक सुहानाबरोबर डान्स करताना दिसला.