Premium

Video: “मग घरीच बसा…,” मुलाचे फोटो काढल्याने भडकला सना खानचा नवरा अनस सय्यद, ट्रोल करत नेटकरी म्हणाले…

सना आणि अनस यांनी त्यांच्या मुलाचं नाव ‘सय्यद तारिक जमील’ असं ठेवलं आहे.

sana khan

अनस सय्यदशी लग्न केल्यानंतर दोन वर्षांनी अभिनेत्री सना खान आई बनली. काही महिन्यांपूर्वीच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सना आणि अनस यांनी त्यांच्या मुलाचं नाव ‘सय्यद तारिक जमील’ असं ठेवलं आहे. पण आता मुलाचे फोटो काढण्यावरून अनस चांगलाच चिडला. पण त्याच्या चिडण्यामुळे आता नेटकरीच त्याला ट्रोल करू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सना खान आणि तिचा पती अनस सय्यद यांचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात अनस, सना त्यांच्या ३ महिन्यांच्या मुलाला घेऊन विमानतळावरून परतताना दिसत आहेत. हे दोघे आनंदाने पोज देताना आणि पापाराझींकडे हसताना दिसले. परंतु पापाराझींनी स्ट्रोलरमध्ये बसवलेल्या मुलाचे फोटो काढण्याचा प्रयत्न करताच अनस चांगलाच संतापला. अनसने लगेच मुलाचा चेहरा स्ट्रॉलर कव्हरने झाकला आणि पापाराझींना मुलाचे फोटो न काढण्याची सक्त ताकीद दिली.

आणखी वाचा : इस्लामसाठी बॉलीवूड सोडणाऱ्या सना खानने केले बाळाचे नाव जाहीर; अर्थ आहे खूपच खास

पण आता त्याच्या या कृतीमुळे चाहत्यांनी त्याचं हे वागणं अतिशय विचित्र आल्याचं म्हटलं. एका यूजरने लिहिलं, “मीडियापासून मुलाचा चेहरा लपवणे हा आजचा ट्रेंड आहे.” तर दुसऱ्या यूजरने म्हटले, “जर मुलाचा चेहरा लपवायचाच असेल, तर घरीच बसा.”

हेही वाचा : इस्लाम धर्मासाठी बॉलिवूड सोडणारी सना खान ३४व्या वर्षी होणार आई, म्हणाली, “लवकरच…”

सना खान नुकतीच तिच्या अडीच महिन्यांच्या मुलासोबत उमराहला गेली होती. त्यांचा उमराह पूर्ण झाला असून त्यांनी काबा शरीफमधील एक खास कौटुंबिक फोटो पोस्ट केला होता. त्यात ती, तिचा मुलगा तिच्या मांडीवर आणि तिचा पती अनस दिसत होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anas sayyad gets troll for getting angry on paparazzi for clicking photos of his son rnv

First published on: 04-10-2023 at 19:17 IST
Next Story
परिणीती चोप्राने आपल्या लग्नात साधा लूक का केला होता? अभिनेत्रीच्या स्टाईलिस्टने केला खुलासा, म्हणाल्या…