Premium

Animal चा वाद पोहचला संसदेत! खासदार म्हणाल्या, “माझी मुलगी रडत रडत….”

Animal Movie : काँग्रेसच्या खासदार रंजीत रंजन यांनी सिनेमातल्या हिंसाचारावर आणि रक्तपातावर आक्षेप घेतला आहे.

Animal made my daughter cry Said Ranjeet Ranjan
काँग्रेस खासदार रंजीत रंजन यांनी चित्रपटाबाबत व्यक्त केला राग

Animal हा सिनेमा १ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. या सिनेमावरुन उलटसुलट प्रतिक्रिया समोर येत आहेत. अॅनिमल सिनेमात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, दिप्ती डिमरी, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमावरुन काही वाद निर्माण झाले आहेत. अशात या सिनेमाचा वाद आता थेट संसदेत पोहचला आहे. काँग्रेस खासदार रंजीत रंजन यांनी माझी मुलगी चित्रपटाच्या मध्यातूनच थिएटरमध्ये बाहेर पडल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे रंजीत रंजन यांनी?

रंजीत रंजन म्हणाल्या, “सिनेमा हा समाजमनाचा आरसा असतो. आम्हीही लहान असल्यापासून सिनेमा पाहत आलो आहे. मात्र आत्ता जे चित्रपट येत आहेत त्यांचा तरुणाईवर गंभीर परिणाम होतो आहे. ‘कबीर सिंग’, ‘अॅनिमल’, ‘पुष्पा’ यांसारख्या चित्रपटांमधून तरुणाईला काय शिकायला मिळेल? माझ्या मुलीच्या महाविद्यालयात अनेक मैत्रिणी आहेत, ज्या महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत आहेत. चित्रपट पाहताना माझ्या मुलीला रडू कोसळलं आणि ती मधेच उठून निघाली. चित्रपटात महिलांचा विनयभंग दाखवण्यात आला आहे. हिंसा तर इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे. तेच तिला पटलं नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Animal made my daughter cry is disrespectful to sikh sentiments congress mp ranjeet ranjan in rajya sabha scj

First published on: 08-12-2023 at 13:57 IST
Next Story
‘नायक २’बद्दल अनिल कपूर यांचं मोठं विधान; इंस्टाग्रामवर चाहत्याला उत्तर देताना केला सीक्वलबद्दल खुलासा