बॉलिवूडमध्ये इतर स्टारकिड्सना ज्याप्रकारे संधी मिळाली तशी संधी या दशकाचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याला मिळाली नाही. ‘रेफ्यूजी’सारख्या चित्रपटातून अभिषेक पदार्पण केलं पण नंतरही त्याचं स्ट्रगल बराच काळ सुरू होतं. अमिताभ बच्चन आणि आई जया बच्चन यांचा मुलगा असल्याने त्याच्यावर प्रचंड दडपणही असल्याचं बऱ्याच ट्रेड एक्स्पर्टनी सांगितलं आहे. सुरुवातीच्या काळात याच अभिषेक बच्चनवर बॉलिवूडचा एक दिग्दर्शक चांगलाच उखडला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दिग्दर्शकाचं अपूर्व लाखिया. अपूर्वने ‘लगान’सारख्या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्याचा ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’ हा चित्रपटही जबरदस्त गाजला. २००३ मध्ये अपूर्व अभिषेककडे ‘मुंबईसे आया मेरा दोस्त’ या चित्रपटाची कथा घेऊन गेला, त्यावेळी अभिषेकने त्याला हा चित्रपट करण्याचं सांगितलं, पण पुढील सहा महीने त्यावर अभिषेककडून काहीच उत्तर आलं नाही.

आणखी वाचा : कमल हासन यांचा अभिनय पाहून अमिताभ बच्चन यांनी अर्धवट सोडलेला ‘हा’ चित्रपट; निर्मात्याने केला खुलासा

युट्यूबर सिद्धार्थ कन्ननशी संवाद साधताना अपूर्व लाखियाने हा किस्सा सांगितला, तो म्हणाला, “एके दिवशी मला अभिषेकचा फोन आला, त्याने मला घरी बोलावलं आणि सांगितलं की हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत बनायला हवा, पण यात मला काम करायला जमणार नाही.” इतके दिवस वाट पाहिल्यावर अभिषेकने नकार दिल्याने अपूर्व चांगलाच नाराज झाला.

पुढे अपूर्व म्हणाला, “अभिषेकचं उत्तर ऐकताच मी तडख तिथून उठलो आणि मी माझी स्क्रिप्ट मागितली. अभिषेकने मला ती स्क्रिप्ट दिली आणि मी तिथून रागात निघायला लागलो. अभिषेकने मला थांबवून मी चिडलो आहे का अशी विचारपूरस केली. त्यावर मी त्याला सांगितलं की हो मी नक्कीच तुझ्यावर चिडलोय, कारण तुला काहीच फरक पडणार नाही कारण तू अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहेस. मला चांगलाच फरक पडणार आहे, मी एक सामान्य माणूस आहे जो ६ महीने वाट बघत होता, ऑटो रिक्षातून फिरत होता.”

आणखी वाचा : “मला लाज वाटली…” मनोज बाजपेयींचा चित्रपट पाहून पत्नी शबानाने केली अभिनेत्याची चांगलीच कानउघडणी

या घटनेनंतर काही दिवसांनी अभिषेकने पुन्हा याचा विचार केला. त्याला अपूर्व लाखियाचा प्रामाणिकपणा भावला आणि त्याने हा चित्रपट करण्यास होकार दिला. यानंतर केवळ अभिषेकच नव्हे तर संपूर्ण बच्चन कुटुंबियांशी अपूर्वचे चांगले संबंध तयार झाले. २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘मुंबईसे आया मेरा दोस्त’ या चित्रपटात अभिषेकसह लारा दत्ता, चंकी पांडे, यशपाल शर्मासारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apoorva lakhia got angry when abhishek rejected his film for first time avn
Show comments