Bade Miyan Chote Miyan box office collection Day 2 : अक्षय कुमार व टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ११ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. गुरुवारी चित्रपटाने ग्रँड ओपनिंग करत बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. त्यानंतर आता चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे.

अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, अलाया एफ व मानुषी छिल्लर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाने पहिल्या दिवशी दमदार सुरुवात केली. गुरुवारी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ने १५.५० कोटींच्या व्यवसाय केला. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे.

अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसाच्या तुलनेत निम्मी कमाई केली. शुक्रवारी चित्रपटाने सात कोटी रुपये कमावले. चित्रपटाचे दोन दिवसांचे एकूण कलेक्शन २२.६५ कोटी रुपये झाले आहे. चित्रपटाची कमाई दुसऱ्या दिवशी घटली असली तरी शनिवार व रविवारी वीकेंड असल्याने चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होऊ शकते.

अवघ्या २० कोटींचं बजेट अन् कमावले २२५ कोटी, एकही अभिनेत्री नसलेला ‘हा’ सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित

अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात दाक्षिणात्य स्टार पृथ्वीराज सुकुमारन व बिजय आनंद यांच्या नकारात्मक भूमिका आहेत. यामध्ये रोनित रॉय बोस आणि इतर अनेक कलाकार आहेत. यात सोनाक्षी सिन्हाने कॅमिओ केला आहे.