बॉलिवूडमधील हीरोंबद्दल जितकी चर्चा होते तितकीच किंवा त्याहून अधिक चर्चा ही खलनायकांबद्दलही होते. गब्बर सिंह, मोगॅम्बो, शाकाल हे बॉलिवूडमधील काही आयकॉनीक व्हिलन्स मानले जातात. ही पात्र साकारणाऱ्या कलाकारांनाही याच भूमिकेमुळे स्वतंत्र अशी ओळख मिळाली. पण याआधी ६० आणि ७० चं दशक हे अशाच एका व्हिलनने गाजवलं ते म्हणजे अजित. ‘जंजीर’, ‘यादों की बारात’, ‘प्रतिज्ञा’, ‘मिस्टर नटवरलाल’ अशा कित्येक गाजलेल्या चित्रपटातून अजित यांनी त्यांच्या अदाकारीने प्रेक्षकांना भारावून टाकलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित यांनी दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांच्या ‘नया दौर’ या चित्रपटात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली, अन् या चित्रपटामुळेच त्यांना खरी ओळख मिळाली, पण या चित्रपटानंतर त्यांचा खडतर प्रवास सुरू झाला याचा खुलासा त्यांचा मुलगा शहजाद खान यांनी केला आहे. यूट्यूबर सिद्धार्थ कन्ननी संवाद साधताना शेहजाद खान यांनी आपल्या वडिलांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल, संघर्षाबद्दल भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : सुपरस्टार रजनीकांत यांचा अंदाजच निराळा; ‘ईकोनॉमी क्लास’मधून प्रवास करत जिंकली चाहत्यांची मनं

‘नया दौर’सारखा चित्रपट करूनही अजित यांना जवळपास ४ ते ५ वर्षं काम मिळत नसल्याचा खुलासा शेहजाद यांनी केला. तसेच त्यावेळचे सगळे नायक हे अजित यांच्या लोकप्रियतेमुळे बिथरायचे. अजित समोर आपण फिके पडू असं त्यांना वाटायचं, शिवाय आपण जर अजित यांच्याबरोबर काम केलं तर सर्व पुरस्कार हे त्यांनाच मिळतील अन् आपल्या कामाची कुणी साधी दखलही घेणार नाही असं त्यावेळच्या नायकांना वाटायचं हा खुलासादेखील शेहजाद यांनी या मुलाखतीदरम्यान केला.

याबरोबरच अभिनयात करिअर करण्यासाठी जेव्हा अजित यांनी मुंबईत पाऊल ठेवलं तेव्हा त्यांनी नेमका काय संघर्ष केला याबद्दल शेहजाद यांनी खुलासा केला. अजित हे त्यावेळी एका गटारात झोपत, त्याबद्दल बोलताना शेहजाद म्हणाले, “एके दिवशी माझ्या वडिलांनी मला मोहम्मद अली रोडजवळचं एक गटार दाखवलं अन् म्हणाले जेव्हा ते हैदराबाद सोडून मुंबईत आले होते तेव्हा डोक्यावर छप्पर नसल्याने ते या गटारात राहायचे.”

आणखी वाचा : ‘दृश्यम’बद्दल मोठी अपडेट समोर; कोरीअन रिमेकनंतर आता चित्रपटाचा बनणार आता हॉलिवूडमध्ये रिमेक

चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी अजित यांनी प्रचंड मेहनत घेतली. १९९८ साली अजित यांचे निधन झाले, त्यापाठोपाठ लगेच शेहजाद यांची आई सारा यांना कॅन्सर झाला. त्यावेळी आपल्या आईचे हॉस्पिटल बिल भरायलादेखील त्यांच्या भावाने नकार दिल्याचा खुलासा शेहजाद यांनी या मुलाखतीदरम्यान केला. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत शेहजाद यांनीही अभिनयात नशीब आजमावून पाहिलं. ‘कयामत से कयामत तक’, ‘अंदाज अपना अपना’, ‘भूत अंकल’, बडे मियां छोटे मियां’सारख्या बऱ्याच चित्रपटात त्यांनी छोट्या भूमिका निभावल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywoods iconic villain ajit slept in gutters during struggle says actors son avn