शाहरुख खानचा ‘जवान’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत असून पहिल्या तीन दिवसांतच चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटात बऱ्याक गंभीर समस्यांवर भाष्य करण्यात आलेलं आहे. शेतकरी आत्महत्या, आरोग्य सुविधा, मतदानाचे महत्त्व अशा वेगवेगळ्या विषयांवर चित्रपटातून भाष्य केलं आहे. कदाचित आता यामुळेच या चित्रपटाला एक राजकीय वळण मिळालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कित्येकांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे. चित्रपटसृष्टीतील बऱ्याच बड्याबड्या कलाकारांनीही शाहरुखच्या स्टारडमचं अन् बॉक्स ऑफिसवर त्याने केलेल्या कमाईचं कौतुक केलं आहे. तर काही लोकांनी याला राजकीय रंग द्यायला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा : रेबेल स्टार प्रभासच्या नव्या चित्रपटाची घोषणा; ‘आदिपुरुष’नंतर अभिनेता साकारणार भगवान शंकराची भूमिका

यासगळ्यात कॉग्रेसचे माजी मंत्री जयराम रमेश यांनीही ‘जवान’चा आधार घेत भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. मध्यंतरी ‘गदर २’ या चित्रपटाचं संसदेत २ दिवस स्क्रीनिंग केलं गेलं हाच मुद्दा घेऊन जयराम रमेश यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, “काही दिवसांपूर्वी नव्या संसद भवनात ‘गदर २’चं स्क्रिनिंग ठेवलं होतं. आता मोदी सरकारमध्ये ‘जवान’चं स्क्रिनिंग संसदेत आयोजित करायची हिंमत आहे का?” असा रोखठोक प्रश्नच त्यांनी विचारला आहे.

शाहरुखने खूप वर्षांनी इतक्या उघडपणे एवढ्या गंभीर विषयांवर चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे काहींनी त्याचं प्रचंड कौतुक केलं आहे तर काही लोक त्यावर आपल्या राजकरणाची पोळी भाजू पहात आहेत. ‘जवान’ सध्या बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayram ramesh challenges modi government to conduct screening of jawan in parliament avn
First published on: 10-09-2023 at 18:18 IST