८० आणि ९० च्या दशकात भारतात पॉप कल्चर रुजवण्यात गायक लकी अली यांचा मोठा वाटा आहे. आजही ते बॉलीवूडमधील आघाडीच्या गायकांपैकी एक मानले जातात. आजही तरुणाईमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारे गायक म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु यशाच्या शिखरावर असताना त्यांनी बॉलीवूडपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. त्यांचे खासगी कार्यक्रम, कॉन्सर्ट सुरू असतात, शिवाय ते सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय आहेत.

नुकतेच एका वादग्रस्त वक्तव्यामुळे लकी अली चर्चेत आले आहेत. फेसबुकवर एक वादग्रस्त धार्मिक वक्तव्य केल्याने लकी अली सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सोशल मीडियामधून लोक त्यांच्यावर टीका करीत आहेत. ब्राह्मण लोकांचा इस्लाम धर्माशी संबंध असल्याचे वक्तव्य त्यांना चांगलेच महागात पडले आहे. यासाठी त्यांना फेसबुकवर जाहीर माफीदेखील मागावी लागली आहे.

anushkta sharma birthday husband virat kohli shares special post
अनुष्का शर्माच्या वाढदिवशी विराट कोहलीची खास पोस्ट; पत्नीबद्दल म्हणाला, “माझ्या आयुष्यात तू नसतीस तर…”
Karisma Kapoor saved Harish
सीनच्या शूटिंगदरम्यान पाण्यात बुडणाऱ्या अभिनेत्याचा करिश्मा कपूरने वाचवला होता जीव, ३३ वर्षांनी हरीशने केला खुलासा
salman khan firing accused attempted suicide (1)
मोठी बातमी! सलमान खान गोळीबार प्रकरणातील एका आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
Harman Baweja blessed with a baby girl
बॉलीवूड अभिनेता ४३ व्या वर्षी दुसऱ्यांदा झाला बाबा, तीन वर्षांपूर्वी केलं होतं गर्लफ्रेंडशी लग्न

आणखी वाचा : Maharashtra Shaheer Trailer : “असा असतो शाहीर… जनतेला चेतवणारा, भावनांना पेटवणारा; बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

आपल्या डिलीट केलेल्या पोस्टमध्ये लकी अली यांनी लिहिले होते की, “ब्राह्मण या शब्दाची व्युत्पत्ती ब्रह्मा या शब्दापासून झाली आहे, हा शब्द ‘अब्राम’पासून तयार झाला आहे आणि हा शब्द अब्राहम किंवा इब्राहिमपासून आला आहे. यामुळेच ब्राह्मण हेदेखील इब्राहिमचे वंशज आहेत. त्यामुळे आपण आपापसात भांडून काय निष्पन्न होणार आहे?” लकी अली यांच्या या पोस्टवर बऱ्याच लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लकी अली पोस्ट
लकी अली पोस्ट

आपल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे दुखावल्या गेलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहून लकी अली यांनी फेसबुकवरच जाहीर माफीदेखील मागितली आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते लिहितात, “माझ्या आधीच्या पोस्टमुळे वादंग निर्माण झाल्याचे माझ्या ध्यानात आले आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, तसे घडले असल्यास मला त्याचा खेद आहे. आपण सगळ्यांनी एकत्र यावे हाच माझा यामागील उद्देश होता. यामुळे माझे बरेच हिंदू बंधू-भगिनी दुखावले गेले आहेत. त्यासाठी मी त्यांची मनापासून माफी मागतो. यापुढे मी कोणतीही पोस्ट करताना अशा कित्येक गोष्टींचा गांभीर्याने विचार करीन आणि अधिक सावध होऊन व्यक्त होईन.” वडील महमूद यांच्या निधनानंतर लकी अली यांनी मुंबईतून आणि मनोरंजनसृष्टीतून काढता पाय घेतला अन् बंगळुरू येथे ते स्थायिक झाले.