मराठी कलाविश्व असो किंवा बॉलीवूड अलीकडच्या काळात कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक अपडेट्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच एका बॉलीवूड अभिनेत्याच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी खास या अभिनेत्याने गाडी चालवल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

मनोरंजन सृष्टीमधील बहुआयामी अभिनेता म्हणून मनीष पॉल याला ओळखलं जातं. आजवर त्याने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरील रिअ‍ॅलिटी शोचा होस्ट म्हणून तो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे मनीष चर्चेत आला आहे.

हेही वाचा : सलमान खानच्या ईद पार्टीला जिनिलीया देशमुखची उपस्थिती, भाईजानच्या बहिणीबरोबर शेअर केला खास फोटो

मनीष पॉल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई विमानतळाबाहेर एकत्र आले. यानंतर दोघांनीही कॅमेऱ्यासमोर पोज दिली. पुढे, मुख्यमंत्री गाडीत बसताच मनीष पॉलने चक्क ड्रायव्हर सीटवर जाऊन गाडी चालवल्याचं पाहायला मिळालं. सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : राजकीय पक्षांचा प्रचार करणार का? स्वप्नील जोशीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला, “पैसे घेऊन विशिष्ट…”

दरम्यान, मनीषला मुख्यमंत्र्यांची गाडी चालवताना पाहून कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर गेल्यावर्षी तो ‘रफुचक्कर’ सीरिजमध्ये झळकला होता. भविष्यात त्याचे चाहते त्याला आणखी नवनवीन प्रोजेक्ट्समध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.