बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली. तिच्या गर्भशयातला ट्यूमर काढण्यात आला. आता राखीला डिस्चार्ज मिळाला असून तिला एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. पण रुग्णालयात उपचार घेताना राखीवर एक जीवघेणा हल्ला झाला होता, ज्याची माहिती तिचा पहिला पती रितेश कुमारने दिली आहे.

काही तासांपूर्वी रितेश कुमारने राखीचा शस्त्रक्रियेनंतरचा पहिला व्हिडीओ शेअर केला होता. “मी खूप आनंदी आहे. राखी लवकरच आपल्यामध्ये असेल. आज तिला शस्त्रक्रियेनंतर चालताना पाहून खूप बरं वाटलं. ईश्वर आणि जनतेचे आभार,” असं कॅप्शनमध्ये लिहित रितेशने राखीचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत, शस्त्रक्रियेनंतर राखीची प्रकृती ठीक असून ती बारीक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. सर्व चाहते राखीची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करत आहेत. शिवाय रितेशने अशा काळात पाठिंबा दिल्यामुळे त्याचं कौतुक करत आहेत.

हेही वाचा – अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये ‘वाका- वाका’ फेम शकिरा करणार परफॉर्म! गायिकेचं मानधन वाचून व्हाल थक्क

रितेशने आज माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा तो म्हणाला, “राखीला सीक्रेट ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. मी सांगणार नाही कुठे ठेवलं आहे. तिच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आम्ही तिथे तिला ठेवलं आहे. जेव्हा ती रुग्णालयात होती तेव्हा तिच्यावर हल्ला झाला होता. तिला जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता. पण आता राखीला डिस्चार्ज मिळाला आहे.”

दरम्यान, राखी सावंत रुग्णालयात दाखल झाल्यापासून रितेश वेळोवेळी तिच्या प्रकृतीबाबत माध्यमांना माहिती देत होता. राखीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर रितेशने माध्यमांशी संवाद साधत ट्यूमरचा फोटो दाखवला होता. त्यावेळेस रितेश म्हणाला होता की, राखीच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. जी शस्त्रक्रिया होती ती यशस्वीरित्या पार पडली आहे. पण ट्यूमर खूप मोठा आहे. तीन तास शस्त्रक्रिया सुरू होती. मी तुम्हाला दाखवू इच्छितो. कारण काही लोक हसत होते. मला नाही वाटतं, अशा लोकांमध्ये माणुसकी राहिली आहे; जे दुसऱ्यांच्या वेदनांची खिल्ली उडवतात.

हेही वाचा – ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेत नितीश चव्हाणबरोबर श्वेता खरात नव्हे तर ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार

“राखी तू विचार करू नकोस. आम्ही तुझी काळजी घेऊ. पण जे काहीजण आहेत, जे माध्यमांमध्ये विधानं करत आहेत. राखीवर आरोप करत आहेत. मी त्यांना सांगतो, लवकरच तुमची उलटी गिनती सुरू होईल. कारण मारणारा आणि बचाव करणारा ईश्वर आहे. जे दोषी आहेत, त्यांना लवकरच तुरुंगात पाठवू. हे निश्चित आहे. जे झुंडमधील लोक आहेत त्यांनी गुपचूप निघून जावं. नाहीतर तुमचं देखील तुरुंगात जाणं निश्चित होईल,” असा इशारा रितेशने दिला होता.