Anant Ambani Radhika Merchant 2nd Pre-Wedding: अनंत अंबानी व राधिका मर्चंट जुलै महिन्यात लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणार आहेत. पण त्यापूर्वी दोघांचे प्री-वेडिंग सोहळे सुरू आहेत. मार्च महिन्यात तीन दिवसांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडल्यानंतर आता चार दिवसांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा रंगणार आहे. पहिला प्री-वेडिंग सोहळा हा भारतातच मोठ्या थाटामाटात झाला होता. पण दुसरा प्री-वेडिंग सोहळा परदेशात होतं आहे. त्यामुळे अंबानी, मर्चंट कुटुंबासह सेलिब्रिटी इटलीसाठी रवाना झाले आहेत.

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा क्रूझवर होणार आहे. २९ मे ते १ जूनपर्यंत दुसरा प्री-वेडिंग सोहळा असून इटली ते फ्रान्स असा प्रवास असणार आहे. क्रूझवर चार दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ८०० पाहुण्यांव्यतिरिक्त ६०० कर्मचारी देखभालीसाठी क्रूझवर उपस्थित असणार आहेत. त्यानिमित्ताने बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी इटलीला रवाना झाले आहेत. अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर-आलिया भट्ट असे बरेच कलाकार रवाना होताना पाहायला मिळाले. पहिल्या प्री-वेडिंगमध्ये जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा जबरदस्त परफॉर्मन्स झाला होता. पण आता अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये जगप्रसिद्ध कोलंबियन गायिका शकिरा परफॉर्म करणार असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेत नितीश चव्हाणबरोबर श्वेता खरात नव्हे तर ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार

टाइम्सच्या वृत्तानुसार, अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याला परफॉर्म करण्यासाठी शकिराला बोलावण्यात आलं आहे. यासाठी अंबानींनी पुन्हा एकदा मोठी रक्कम मोजली आहे. पण सध्या याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

शकिरा भारतात ‘वाका वाका’, ‘हिप्स डोंट लाइ’, ‘व्हेनएवर व्हेनएवर’ या गाण्यांमुळे प्रसिद्ध आहे. माहितीनुसार, शकिरा खासगी कार्यक्रमांसाठी जवळपास १० ते १५ कोटी मानधन घेते. पहिल्या प्री-वेडिंगला अंबानींनी रिहानाला परफॉर्मसाठी ७४ कोटी रुपये दिले होते. त्यामुळे शकिरा देखील याच्या जवळपास मानधन दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शकिरा व्यतिरिक्त अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला इवांक ट्रम्प, मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स सारखे दिग्गज मंडळी हजेरी लावू शकतात.

हेही वाचा – Video: भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नाआधीच्या कार्यक्रमांना पारंपरिक पद्धतीत झाली सुरुवात, पाहा व्हिडीओ

पहिल्या प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये काय-काय झालं होतं?

अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, १ मार्चला जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलीवूडचे तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तिसऱ्या दिवशी, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. या सोहळ्याला १२०० पाहुण्यांनी उपस्थितीत लावली होती.