Premium

Video : ४७ वर्षीय रणदीप हुड्डा गर्लफ्रेंडबरोबर अडकला विवाहबंधनात! मणिपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने पार पडलं लग्न

Randeep Hooda Wedding Updates : रणदीप हुड्डाने दहा वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंड लिन लैशरामशी केलं लग्न, व्हिडीओ व्हायरल

randeep hooda married to his long time girlfriend lin laishram
Randeep Hooda Wedding : रणदीप हुड्डा अडकला विवाहबंधनात

Randeep Hooda Wedding : मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वात सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची गर्लफ्रेंड लिन लैशराम यांचा पारंपरिक विवाहसोहळा आज (२९ नोव्हेंबर) मणिपूर येथे पार पडला. दोघांच्या लग्नाला जवळचे नातेवाईक व कुटुंबीय उपस्थित होते. रणदीपने गेल्या आठवड्यात इन्स्टाग्रामवर लग्नपत्रिका शेअर करत त्याच्या लग्नाची तारीख जाहीर केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मणिपूर येथील इंफाळमध्ये रणदीप आणि लिनचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. रणदीपने अद्याप त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंट्सवर लग्नाचे फोटो शेअर केलेले नाहीत. परंतु, त्याच्या लग्नातील अनेक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. हा लग्नसोहळा मणिपूर येथील पारंपरिक विवाह पद्धतीनुसार पार पडत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम संजनाचा आनंद गगनात मावेना! ‘अशी’ झाली हेमा मालिनींबरोबर ग्रेट भेट, अनुभव सांगत म्हणाली…

रणदीप आणि लिनने मणिपूरमधील पारंपरिक पद्धतीनुसार लग्नात पोशाख परिधान केला होता. त्यांच्या लग्नात फक्त जवळचे नातेवाईक व कुटुंबीय उपस्थित होते. महाभारतात अर्जुनने राजकुमारी चित्रांगदाबरोबर ज्या ठिकाणी विवाह केला त्याच ठिकाणी रणदीपने त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर सात फेरे घेतले आहेत. रणदीप आणि लिनच्या वयात जवळपास १० वर्षांचा फरक आहे. अभिनेता आता ४७ वर्षांचा असून त्याची गर्लफ्रेंड सध्या ३७ वर्षांची आहे.

हेही वाचा : सलमान खानशी खोटं बोलला ओरी, ‘त्या’ विधानावरून घेतली माघार; म्हणाला, “मुंबईमध्ये एखाद्या श्वानासारखं…”

दरम्यान, रणदीपप्रमाणे लिनदेखील मनोरंजनसृष्टीत सक्रिय आहे. लिनला मणिपूरची लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटाद्वारे तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘जाने जान’, ‘रंगून’, ‘मटरू की बिजली का मंडोला’, ‘हॅट्रिक’ अशा असंख्य चित्रपटांमध्ये लिनने काम केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Randeep hooda married to his long time girlfriend lin laishram in manipur sva 00

First published on: 29-11-2023 at 20:22 IST
Next Story
“आम्ही प्रेक्षकांचे पैसे…” ‘अंतिम’ व ‘किसी का भाई किसी की जान’च्या अपयशाबद्दल सलमान खान प्रथमच बोलला