Swatantra Veer Savarkar box office Collection Day 6 : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले आहेत. हा सिनेमा हिंदी व मराठी या दोन भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. रणदीप हुड्डाने या चित्रपटात वीर सावरकर यांची भूमिका केली असून चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे. या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच पहिल्या दिवशी १.०५ कोटी रुपये कमावले, दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी व तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी २.७ कोटी रुपयांची कमाई केली. सोमवारी चौथ्या दिवशी चित्रपटाने २.२५ कोटी रुपयांची कमाई केली. पाचव्या दिवशी १.१० कोटी रुपये कमावले. तर सहाव्या दिवशी चित्रपटाने ८६ लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. याचबरोबर चित्रपटाचं एकूण कलेक्शन १०.०६ कोटी रुपये झालं आहे.

Swatantra Veer Savarkar Total box office Collection
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शित होऊन २० दिवस पूर्ण, एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या
Akshay Kumar lifted 192 kg Wrestler had slipped disc in Khiladiyon Ka Khiladi film
“१९२ किलोच्या रेसलरला उचललं अन्…”, अक्षय कुमारची झाली होती ‘अशी’ अवस्था; सांगितली ‘त्या’ चित्रपटाची आठवण
Swatantra Veer Savarkar box office Collection Day 11
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या कमाईत मोठी घट, ११ व्या दिवशी कमावले ६० लाख, एकूण कलेक्शन जाणून घ्या
Crew box office collection day 1
‘क्रू’ चित्रपटाची दमदार सुरुवात, करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी प्रेक्षकांना भावली, पहिल्या दिवशी केली जबरदस्त कमाई

शरद पोंक्षेंची रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाले, “खूप लोक…”

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटात वीर सावरकर यांचा जीवनप्रवास दाखविण्यात आला आहे. या चित्रपटासाठीसाठी रणदीप हुड्डाने खूप मेहनत घेतली आहे. त्याने हिंदी व मराठी दोन भाषेत चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या एकूण कमाईत हिंदी भाषेतील कलेक्शन जास्त आहे.