बॉलीवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कोंकणा सेन शर्मा होय. तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. नुकत्याच आलेल्या ‘किलर सूप’ या सीरिजमधील अभिनयासाठी तिचं खूप कौतुक झालं. उत्तम दिग्दर्शिका व अभिनेत्री असलेली कोंकणा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

कोंकणाने २०१० मध्ये अभिनेता रणवीर शौरी याच्याशी लग्न केलं होतं. पण १० वर्षांच्या संसारानंतर ते २०२० मध्ये विभक्त झाले. या जोडप्याला एक मुलगा देखील आहे. आता पुन्हा एकदा कोंकणाच्या आयुष्यात प्रेम आल्याचं म्हटलं जातंय. कोकणा तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अमोल पराशरला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले…

४४ वर्षी कोंकणा व ३७ वर्षीय अभिनेता अमोल पराशर एकमेकांसह डेटिंग करत असल्याच्या चर्चा होत्या. यावर कोंकणाचा पूर्वाश्रमीचा पती रणवीर शौरीने प्रतिक्रिया दिली आहे. त्याची प्रतिक्रिया व्हायरल झाल्यानंतरच कोंकणा व अमोल खरंच रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातंय.

श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”

एका एक्स अकाउंटवरून अमोलच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात अमोल एका राजकीय इव्हेंटबद्दल बोलतोय. त्याचा स्क्रीनशॉट शेअर करताना लिहिलंय, ‘कोंकणा सेन शर्माने मोदी भक्त रणवीर शौरी सोडून धर्मनिरपेक्ष अमोल पराशरला डेट करण्याचा सर्वात चांगला निर्णय घेतला.’ या पोस्टवर रणवीर शौरीने कमेंट केली आहे. “होय, मी पण सहमत आहे,” असं रणवीरने म्हटलंय. त्याने ही कमेंट करून कोंकणा व अमोलच्या नात्यावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा होत आहे.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

कोंकणा व अमोलने ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटानंतर अनेकदा त्यांच्या अफेअरच्या अफवा पसरल्या होत्या, पण दोघांनीही यावर कधीच प्रतिक्रिया दिली नाही. आता रणवीरच्या या कमेंटनंतर पुन्हा कोंकणा व अमोलचं नातं चर्चेत आहे.