Premium

रितेश देशमुखने सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला खास फोटो! जिनिलीयाची आई कमेंट करत म्हणाली…

“एकाच फ्रेममध्ये…”, सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट! म्हणाला…

riteish deshmukh birthday post for his mother in law
रितेश देशमुखची सासूबाईंसाठी खास पोस्ट

जिनिलीया आणि रितेश देशमुख यांची जोडी बॉलीवूडसह मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या देशमुख किंवा डिसोझा कुटुंबातील कोणत्याही जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असला की, दोघेही आवर्जून खास फोटो किंवा व्हिडीओ शेअर करतात. आज रितेशने त्याच्या लाडक्या सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रितेशने सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीया आणि तिची आई जीनेट यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत जिनिलीयाने वेडिंग ड्रेस परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. हा फोटो रितेश-जिनिलीया यांच्या लग्नात २०१२ मध्ये काढलेला आहे. अभिनेता लिहितो, “एकाच फ्रेममध्ये दोन सौंदर्यवती! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई…आमच्या कायम पाठिशी राहिल्याबद्दल तुमचे खूप आभार! तुम्हाला भरपूर प्रेम, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो!”

हेही वाचा : ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याची ‘झी मराठी’च्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत होणार एन्ट्री! तितीक्षा तावडेने शेअर केली पोस्ट

रितेशने शेअर केलेल्या फोटोवर जिनिलीयाच्या आईने “थँक्यू राजाबेटा…माझ्या मदतीची तुला आवश्यकता नाही कारण, तुच नेहमी मला आधार देतोस”, अशी कमेंट केली आहे. रितेशप्रमाणे जिनिलीयाने सुद्धा तिच्या लाडक्या आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. “तुझा विचार केल्याशिवाय माझा एक दिवसही सरत नाही” असं जिनिलीयाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : “आमचं नातं आणि लग्न खासगी ठेवलं कारण…”, पियुष रानडेशी लग्न केल्यावर सुरुची अडारकरने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…

दरम्यान, जिनिलीया-रितेशने शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी “रितेशसारखा काळजी घेणारा जावई सर्वांना मिळो!” अशा कमेंट अभिनेत्याच्या पोस्टवर केल्या आहेत. याशिवाय त्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर रितेश सध्या बहुचर्चित ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Riteish deshmukh shares special post for wishing his mother in law sva 00

First published on: 07-12-2023 at 18:07 IST
Next Story
रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ची सहाव्या दिवशी रेकॉर्डतोड कमाई; शाहरुखच्या ‘पठाण’, ‘जवान’ चित्रपटांनाही टाकलं मागे