Premium

‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याची ‘झी मराठी’च्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत होणार एन्ट्री! तितीक्षा तावडेने शेअर केली पोस्ट

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मध्ये होणार ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, यापूर्वी ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत साकारलेली भूमिका

thipkyanchi rangoli fame rajan tamhane will enter in zee marathi satvya mulichi satvi mulgi serial
सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत येणारी रंजक वळणं आणि रहस्यमय कथानक यामुळे अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेचं कथानक रंजक वळणावर असतानाच येत्या काही दिवसात एका नव्या सुप्रसिद्ध कलाकाराची मालिकेत एन्ट्री होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत नेत्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री तितीक्षा तावडेने यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. लवकरच या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते राजन ताम्हणे एन्ट्री घेणार आहेत. ते या मालिकेत नेमकी कोणती भूमिका साकारणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा : सुप्रिया पाठारेंच्या लेकाचं हॉटेल होणार पुन्हा सुरू! दोन महिन्यांपासून होतं बंद, अभिनेत्री म्हणाल्या, “आम्ही…”

राजन ताम्हणे यांनी यापूर्वी ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत अप्पूचे वडील कौशिक वर्तक यांची भूमिका निभावली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. याशिवाय गेल्यावर्षी प्रसारित होणाऱ्या उमेश कामत आणि मुक्ता बर्वेच्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत ते नायिकेच्या वडिलांच्या (मुक्ता बर्वेचे ऑनस्क्रीन वडील) भूमिकेत झळकले होते.

हेही वाचा : “आमचं नातं आणि लग्न खासगी ठेवलं कारण…”, पियुष रानडेशी लग्न केल्यावर सुरुची अडारकरने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…

सातव्या मुलीची सातवी मुलगी

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या रहस्यमय मालिकेत राजन ताम्हणे नेमकी कोणती भूमिका साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाते. यामध्ये तितीक्षा तावडे, अजिंक्य ननावरे, ऐश्वर्या नारकर, श्वेता मेहेंदळे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thipkyanchi rangoli fame rajan tamhane will enter in zee marathi satvya mulichi satvi mulgi serial sva 00

First published on: 07-12-2023 at 16:50 IST
Next Story
Video: अखेर मुक्ता-सागरचा पार पडला साखरपुडा; एकमेकांना घातली स्पेशल अंगठी