Premium

“आमचं नातं आणि लग्न खासगी ठेवलं कारण…”, पियुष रानडेशी लग्न केल्यावर सुरुची अडारकरने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…

Suruchi Adarkar Piyush Ranade Wedding : “…म्हणून आमचं नातं खासगी ठेवलं”, सुरुची अडारकरने केलं लग्नाबद्दल भाष्य, म्हणाली…

suruchi adarkar talks about her private relationship and marriage with piyush ranade
सुरुची अडारकर व पियुष रानडे यांचं लग्न

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकरने ६ डिसेंबरला ‘काव्यांजली’ फेम पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीने या लग्नसोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. लग्न पार पडल्यावर सुरुचीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच तिच्या व पियुषच्या नात्याबाबत भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरुची आणि पियुष यांच्या लग्नाला त्यांचे जवळचे नातेवाईक आणि काही मोजकेच कलाकार उपस्थित होते. त्यांच्या लग्नाबद्दल जवळचे कुटुंबीय सोडून इतर कोणालाही कल्पना नव्हती. सुरुचीने इन्स्टाग्रामवर अचानक शेअर केलेले फोटो पाहून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. यासंदर्भात अभिनेत्री म्हणाली, “माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मी खासगी ठेवते. काही जवळचे लोक सोडल्यास मी माझ्या खासगी आयुष्याची कल्पना इतर कोणालाही देत नाही आणि हा माझा आधीपासूनचा स्वभाव आहे.”

हेही वाचा : सुप्रिया पाठारेंच्या लेकाचं हॉटेल होणार पुन्हा सुरू! दोन महिन्यांपासून होतं बंद, अभिनेत्री म्हणाल्या, “आम्ही…”

सुरुची पुढे म्हणाली, “माझ्या स्वभावानुसार मी या नात्याबद्दल फार कोणालाही समजू दिलं नव्हतं. त्यामुळे आमच्या लग्नाला आमचे काही जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.” लग्नात मोजकेच लोक उपस्थित असले तरी या सोहळ्यातील खास क्षणांचे फोटो-व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हेही वाचा : पियुष रानडेशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला? सुरुची अडारकर म्हणाली, “तो माणूस म्हणून…”

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सुरुची सध्या ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याशिवाय पियुष रानडे ‘काव्यांजली’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Suruchi adarkar talks about her private relationship and marriage with piyush ranade sva 00

First published on: 07-12-2023 at 15:13 IST
Next Story
सुरुची अडारकर आणि पियुष रानडेच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो समोर, पोस्ट शेअर करत म्हणाली…