Premium

‘सॅम बहादूर’ Review: विकी कौशलचा अभिनय ही एकच जमेची बाजू, बाकी सगळा भ्रमनिरासच!

Sam Bahadur Review : सिनेमाला जाण्याआधी हा रिव्ह्यू एकदा वाचाचा.

Sam Bahadur Movie Review
कसा आहे सॅम बहादुर सिनेमा ? वाचा रिव्ह्यू (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

आपण खूप अपेक्षेने एखादी कलाकृती पाहण्यासाठी जावं आणि आपला भ्रमनिरास व्हावा तशीच भावना ‘सॅम बहादूर’ सिनेमा पाहून आली. सॅम माणेकशॉ यांची कारकीर्द दैदिप्यमान होती यात काही शंकाच नाही. मात्र सिनेमात ते सगळं उतरवत असताना पटकथेचा, दिग्दर्शनाचा, पात्र निवडीचा सगळ्याचाच अंदाज चुकला आहे. विकी कौशलने सॅम बहादुर यांची लकब पकडण्यासाठी, त्यांच्यासारखं दिसण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. मात्र बाकी सगळा आनंदी आनंद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिनेमा एकसंध नाही

सिनेमाची सुरुवात सॅम माणेकशॉ यांच्या जन्माच्या प्रसंगाने होते. बाळाचं नाव काय ठेवायचं ? यावर सॅम माणेकशाँचे आई-वडील एका घटनेची चर्चा करताना दिसतात आणि आपल्या बाळाचं नाव बदलू असं म्हणतात. त्यानंतर थेट सॅम माणेकशाँची एंट्री होती. विकी कौशलला थोडसं ब्लर दाखवणं आणि मग सॅम बहादूर हे नाव येताच त्याचा चेहरा एकदम क्लिअर होणं हा प्रयोग चांगला जमला आहे. पुढचा सिनेमा म्हणजे एका मागोमाग एक येणाऱ्या प्रसंगांची मालिका आहे. त्यात सलगपणा नाही. पहिल्या प्रसंगात सॅम माणेकशॉ एका गोरखा रेजिमेंटच्या एका जवानाला नाव विचारतात तो उत्तर देतो सॅम बहादूर.. त्यावर सॅम माणेशाँचं स्मित हास्य.. कट टू या प्रसंगाचं वर्तुळ पूर्ण होतं. मात्र तोपर्यंत आपण एकामागोमाग एक घटना पाहात राहतो. त्यात कुठेच जोड वाटत नाही. हा प्रसंग झाला आता पुढचा प्रसंग.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sam bahadur movie review know how the film is read in detail scj

First published on: 02-12-2023 at 07:15 IST
Next Story
‘या’ बॉलीवूड अभिनेत्याच्या राजवाड्यात झालंय ‘अ‍ॅनिमल’चं शूटिंग; फोटो आला समोर