सध्या हृतिक रोशन व दीपिका पदुकोणच्या ‘फायटर’ या चित्रपटाची चहूबाजूने चर्चा सुरू आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट बक्कळ कमाई करताना दिसत आहे. ‘फायटर’ चित्रपटाचा टीझर, ट्रेलर, गाणी या सगळ्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाच्या ट्रेलरची भुरळ बॉलीवूडच्या बादशहाला देखील पडली आहे. याबद्दलचा किस्सा ‘फायटर’ चित्रपटाचा निर्माता सिद्धार्थ आनंदने सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निर्माता सिद्धार्थ आनंद म्हणाला, “न्यूज १८ या वृत्तसंस्थेला सांगताना शाहरुख म्हणाला की, त्याला फायटरचा ट्रेलर खूप आवडला. खरंतर ट्रेलर प्रदर्शित झाला, त्याच दिवशी आम्ही दोघं भेटलो होतो. तेव्हाच त्याने मला सांगितलं होतं की, चित्रपटातील खलनायकाचा लूक आणि स्टंट्स त्याला खूप आवडले. शिवाय सीजीआय (CGI) आणि वीएफएक्सचं (VFX) काम उत्तमरित्या झालं आहे.”

हेही वाचा… विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ आता ओटीटीवर; कधी, कुठे, कसा, जाणून घ्या…

पुढे सिद्धार्थ म्हणाला की, ‘पठाण’च्या यशामुळे फायटरकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पण, मी ‘पठाण’ आणि ‘फायटर’मध्ये कोणतीच तुलना करू इच्छित नाही.

ब्लॉकबास्टर ‘पठाण’ या सिनेमासाठी निर्माता सिद्धार्थ आनंद आणि शाहरुख खान यांनी पहिल्यांदाच एकत्रित काम केलं होत. या चित्रपटाने जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई केली होती.

हेही वाचा… पहिल्या फोटोशूटला हृतिक रोशनने लपवली होती आपली ओळख; प्रसिद्ध फोटोग्राफरचा खुलासा

दरम्यान, बहुप्रतीक्षित व बहुचर्चित ‘फायटर’ २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हृतिक आणि दीपिकासह अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सहायक भूमिकेत करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, तलत अजीज दिसणार आहेत. हा चित्रपट २५ जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पहिल्या दिवसासाठी एक लाखांहून अधिक तिकिटांची अॅडव्हॉन्स बुकिंग झाली असून प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने ३.६६ कोटींची कमाई केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan review on fighter movie trailer sidhharth anand hrithik roshan and deepika padukon dvr
First published on: 23-01-2024 at 19:13 IST