Premium

सूरज पांचोली लवकरच अडकणार विवाहबंधनात? मिस्ट्री गर्लबाबत खुलासा करत म्हणाला…

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीच्या आयुष्यात एक नवीन मुलगी आली आहे.

suraj pancholi
सूरज पांचोली लवकरच अडकणार विवाहबंधनात

बॉलीवूड अभिनेता सूरज पांचोली नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणातून सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. १० वर्षांनंतर या प्रकरणी निकाल लागला. दरम्यान सूरज आता नव्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. जिया खान नंतर सूरजच्या आयुष्यात एक नवीन मुलगी आली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सूरजने याबाबतचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘जवान’ने रविवारी रचला इतिहास! चौथ्या दिवशी केली जबरदस्त कमाई; ‘पठाण’सह ‘KGF 2’, ‘बाहुबली २’ चा रेकॉर्ड मोडला, वाचा आकडे

एकेकाळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेला सूरज पांचोली या १० वर्षांत सोशल मीडियापासून खूप दूर गेला होता. पूर्वी सोशल मीडियावर फोटो टाकत तो चाहत्यांशी जोडलेला असायचा. मात्र जिया खानच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाची सगळीकडे चर्चा वाढायला लागली. तेव्हा सूरजनेही स्वतःला प्रसिद्धीपासून दूर केले. त्या घटनेनंतर सूरजने सोशल मीडियावर पोस्ट टाकणं खूप कमी केलं होतं. सार्वजनिक ठिकाणीही त्याने जाणे कमी केलं. एवढचं नाही तर पार्ट्यांमध्ये जाणं त्याने पूर्णपणे बंद केलं होतं.

हेही वाचा- “मला अजून २-३ मुलं चालतील पण…”, जिनिलीया गरोदर असल्याच्या अफवांवर रितेश देशमुखने दिलं स्पष्टीकरण

मात्र नुकतच एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या लव्ह लाईफबाबत खुलासा केला आहे. गेली ७ वर्ष सूरज एका मुलीला डेट करत आहे. त्याची प्रेयसी अभिनेत्री नाही. सूरजने अद्याप त्या मिस्ट्री गर्लबाबत कोणताही खुलासा केला नसला तरी तो रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने कबूल केलं आहे. एवढंच नाही तर लवकरच आम्ही लग्न करणार असल्याचेही त्याने जाहीर केलं आहे.

अभिनेत्याने जिया खानच्या नात्यावर मौन सोडले आहे. तो म्हणाला की, “जियाबरोबर माझे फार कमी काळ संबंध होते. तेव्हापासून मी रिलेशनशिपमध्ये आहे आणि आम्ही ७ वर्षांपासून एकत्र आहोत. ही एक अतिशय सुंदर अनुभूती आहे जी मी शब्दात व्यक्त करु शकत नाही.”

हेही वाचा- Video: “आत्महत्येचा विचार…”, आमिर खानच्या लेकीने केलं स्पष्ट भाष्य, आयराचा व्हिडीओ चर्चेत

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री जिया खानने ३ जून २०१३ साली जुहूमधील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सूरजला अटक करण्यात आली होती. तब्बल १० वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला आणि सूरजची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sooraj pancholi after jiah khan has been dating this girl for seven years said she is very beautiful dpj

First published on: 11-09-2023 at 11:58 IST
Next Story
Video: “आत्महत्येचा विचार…”, आमिर खानच्या लेकीने केलं स्पष्ट भाष्य, आयराचा व्हिडीओ चर्चेत