सुचित्रा पिल्लई ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘दिल चाहता है’ मध्ये तिने सैफ अली खानच्या गर्लफ्रेंडची जबरदस्त भूमिका साकारली होती. करिअरमध्ये अनेक विविधांगी भूमिका साकारणारी सुचित्रा सध्या श्रिया पिळगांवकर, जयदीप अहलावत आणि सोनाली बेंद्रे यांच्या ‘द ब्रोकन न्यूज २’ मुळे चर्चेत आहे. एकेकाळी तिला बॉयफ्रेंड पळवणारी म्हटलं गेलं होतं. सीरिजच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्यावर झालेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सुचित्राने खुलासा केला की तिचा पती लार्स केएल्डसनने तिच्याआधी बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट केलं होतं. परंतु त्यांच्या ब्रेकअपचं कारण आपण नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. प्रसारमाध्यमांनी सुचित्राला बॉयफ्रेंड पळवणारी म्हटलं होतं. त्यावर सुचित्रा म्हणाली, “प्रीती आणि मी कधीच मैत्रिणी नव्हतो, आमची कॉमन फ्रेंड असल्यामुळे आम्ही एकमेकांना ओळखायचो. पण, होय, लार्सने प्रीती झिंटाला काही काळ डेट केलं होतं. पण मला भेटण्यापूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं होतं. मी त्या दोघांच्या मध्ये आले नव्हते. त्यांनी वेगळ्या कारणासाठी ब्रेकअप केलं होतं.”

Video: माधुरी दीक्षितच्या मोठ्या बहिणीला पाहिलंत का? ‘तो’ खास व्हिडीओ पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर

सुचित्राला फक्त प्रीती व लार्समुळेच बॉयफ्रेंड पळवणारी म्हटलं गेलं नाही तर आणखी एका नात्यामुळे म्हटलं गेलं. सुचित्रा म्हणाली, “ती बातमी खरं तर गैरसमज होती, त्यांचं ब्रेकअप माझ्यामुळे झालं नव्हतं. मी इंग्लंडहून परत आले त्यावेळेस हे घडलं. काही मासिकांच्या पहिल्या पानावर मला ‘बॉयफ्रेंड पळवणारी’ म्हटलं गेलं. ‘सुचित्रा पिल्लई ‘बॉयफ्रेंड पळवणारी’ आहे,’ असा त्यांचा मथळा होता. एकेकाळी जेव्हा मी अँड्र्यू कोयनला डेट करायला सुरुवात केली होती, तेव्हा त्याने भारतात स्टार टेलिव्हिजन सुरू केले होते. त्यावेळी माझ्यामुळे अँड्र्यू आणि त्याची पार्टनर मॉडेल अचला सचदेव वेगळे झाले असंही म्हटलं गेलं. पण तसं नव्हतं. आता खरं तर बरीच वर्षे झाली आहेत आणि त्याबद्दल बऱ्याचदा मी आणि अचला हसत असतो.”

“मला त्याबद्दल शून्य इंटरेस्ट…”, सुबोध भावे ‘त्या’ प्रश्नावर स्पष्टच बोलला; अभिनेत्याने पुण्यात केलं मतदान

दरम्यान, सुचित्रा पिल्लईने २००५ मध्ये लार्स केएल्डसनशी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला १९ वर्षे झाली आहेत. त्यांनी अनिका नावाची एक मुलगी आहे. तर, प्रीती झिंटाने २०१६ फायनान्स अॅनालिस्ट जीन गुडइनफशी लग्न केलं. लग्नानंतर पाच वर्षांनी २०१२ मध्ये सरोगसीद्वारे या जोडप्याने जुळ्या बाळांचं स्वागत केलं. त्यांच्या मुलीचं नाव जिया तर मुलाचं नाव जय आहे.