अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी त्यांच्या भारत दौऱ्यात बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची भेट घेतली होती. या भेटीबद्दल ऑफिसमध्ये सांगितल्यावर कुणालाच विश्वास बसत नव्हता, ते आश्चर्यचकित झाले होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे. तसेच माझ्या देशातील लोकांचं शाहरुखवर इतकं प्रेम आहे, याची मला जाणीव नव्हती, असंही ते म्हणाले.

“मी शाहरुख खानला भेटलो हे कळाल्यावर माझ्या ऑफिसमधील लोकांनी मला विचारलं, ‘तुला माहित आहे का तू कोणाला भेटलास?’ मी म्हटलं ‘हो, मी शाहरुख खानला भेटलो.’ माझ्या व शाहरुखच्या भेटीबद्दल त्या सर्वांना खूप आश्चर्य वाटलं होतं. त्या भेटीत मी शाहरुखशी क्रिकेटबद्दल गप्पा मारल्या होत्या, कारण तो क्रिकेट टीमचा मालक आहे. तो लॉस एंजेलिस टीमचा भाग आहे. माझ्या भेटीबाबत कळताच ऑफिसमधील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता,” असं गार्सेट्टी एएनआयशी बोलताना म्हणाले.

pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…
Salman Khan was the bartender at Riddhima Kapoor wedding
रणबीर कपूरच्या बहिणीच्या लग्नात बारटेंडर होता सलमान खान; ऋषी कपूर त्याला म्हणाले होते, “तू निघ तिथून…”
President Draupadi Murmu Standing While Giving Bharatratna Award To Lalkrishna Advani
लालकृष्ण अडवाणींना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार मिळताना मोदींकडून नियमभंग? लोक म्हणतात, “शिस्त- शिक्षणाचा..”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

रणबीर कपूरच्या बहिणीच्या लग्नात बारटेंडर होता सलमान खान; ऋषी कपूर त्याला म्हणाले होते, “तू निघ तिथून…”

“बॉलीवूड, क्रिकेट पाहणं, भारतातील खाद्यपदार्थ या सगळ्या गोष्टी आश्चर्यकारक आहेत. खरं तर माझ्या कामाची हीच गंमत आहे. इथे मी फक्त धोरणांबद्दल बोलत नाही, तर लोकांना भेटतो. लोक राजकारणातून जात येत राहतात, पण आम्ही ज्या लोकांना भेटतो, त्यांच्याशी आयुष्यभर ओळख टिकून राहिल,” गार्सेट्टी म्हणाले.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या कमाईत मोठी घट, ११ व्या दिवशी कमावले ६० लाख, एकूण कलेक्शन जाणून घ्या

गार्सेट्टी भारत-अमेरिकेच्या संबंधांबद्दल म्हणाले, “भारत-अमेरिकेचे संबंध देखील असेच टिकून राहतील. मी जास्तीत जास्त भारतीय लोकांना अमेरिकेत आणू शकेन, अशी मला आशा आहे. कारण मला वाटतं की इथल्या लोकांचे अमेरिकेशी दृढ संबंध आहेत आणि भारतीय खरोखरच अमेरिकन लोकांना ओळखतात. अमेरिकेत प्रत्येकाचा एखादा चुलत भाऊ किंवा मित्र असतो.”

गार्सेट्टी यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात शाहरुख खानच्या मुंबईतील ‘मन्नत’ या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी त्यांनी बॉलीवूड व त्याचा जगावर असलेला सांस्कृतिक प्रभाव यावर चर्चा केली होती.